शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “मी कोणालाच भीत नाही, फोडणार आणि…”, नॉमिनेट करण्यावरुन पॅडीला स्पष्टच बोलला सूरज, म्हणाला, “काहीही करा पण…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 3, 2024 | 3:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates suraj chavan and paddy aka pandharinath kamble fun vide viral on social media

Bigg Boss Marathi 5 मध्ये नॉमिनेट करण्यावरुन सूरज पॅडीला स्पष्टच बोलला आहे

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वात आपल्या साध्या व सोप्या राहणीमानाने घरातील सदस्यांबरोबरच घराबाहेरील प्रेक्षकांची मनं जिंकणारा स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. घरात आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच सूरजने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्याला या घरातील टास्क व गेम कळत नसल्याबद्दल अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. रितेशनेदेखील त्याने खेळ समजून घेऊन मग खेळावा असं म्हटलं आहे. सूरजचं या घरातील प्रत्येक स्पर्धकाबरोबर चांगलंच जमतं. या घरात त्याचे कुणाशीही मतभेद किंवा वाद नसून त्याने केलेल्या प्रत्येक कृतीचे कौतुक केलं जातं. घरात आल्यापासून तो ‘टीम बी’बरोबर राहत आहे. त्यामुळे या टीममधील सर्वांबरोबर त्याचं चांगलंच जमतं. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सूरजने सर्वांबरोबर चांगलेच बंध तयार केले आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीबरोबरचा त्याचा बॉण्ड खास आहे आणि हे वेळोवेळी प्रेक्षकांना पाहायलादेखील मिळाले आहे. धनंजय, अभिजीत, पॅडी व अंकिता यांच्याबरोबर त्याचं खास नातं तयार झालं असून या प्रत्येकाबरोबरचे खास क्षण प्रेक्षकांनी अनुभवले आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात पॅडी व सूरज यांच्यातली मजामस्ती प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग खूपच रंजक असणार आहे. आज सूरज व पॅडी एकमेकांबरोबर मजामस्ती करताना दिसणार आहेत. पॅडी कांबळे सूरजला म्हणत आहेत की, “पुढच्यावेळी नॉमिनेशनमध्ये मी तुला नॉमिनेट करणार आहे”. त्यावर पॅडी दादांना उत्तर देत सूरज म्हणतो की, “तुम्ही काहीही करा. मी भीत नाही. मी घरातल्या कोणालाच भीत नाही”.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मी बेकार गेम खेळणार”, अभिजीत-पॅडीला सूरजने स्पष्टच सांगतिलं, दोघंही समजूत काढत म्हणाले, “दहा वेळा विचार करुन…”

यावर पॅडीही “मी तुला भीतो का?” असं म्हणतात. पुढे सूरज असं म्हणतो की, “आता मी फोडणार आणि फूल नडणार”. यावर पॅडी त्याला “काय करणार?” असं विचारतात. पुढे सूरज गंमतीने त्यांना असं म्हणतो की, “तुमच्या पोटाच्या चकल्या करेल. तोंडावर बोट ठेवा आणि शांत बसा. एकही शब्द बोलू नका”. मग सुरज पुन्हा त्यांना गंमतीने “तुमच्या पोटात बुक्की हाणू का?” असं म्हणतो. यावर पॅडी कांबळे सूरजला ” हा कर तुला काय करायचं आहे ते कर. तू काय किंग आहेस. त्यामुळे तू काहीही करु शकतोस” असं मस्करीत म्हणतात.

आणखी वाचा – “आधी घनःश्याम नंतर डीपी बाहेर पडेल”, मराठी अभिनेत्याच्या कमेंटवर भडकले प्रेक्षक, म्हणाले, “हे तुम्ही सांगू नका आणि…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सदस्यांपैकी कोण आपला गेम प्लॅन अधिक चांगला आखणार? कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार? याकडे ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांच्या लक्ष लागले आहे. 

Tags: bigg boss marathi 5Pandharinath KambleSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
prasad oak and manjiri oak children

प्रसाद ओकला लेकाने २२व्या वर्षी गिफ्ट केली महागडी कार, मंजिरी ओक भावुक, म्हणाली, "आज बाबाच्या चेहऱ्यावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.