Bigg Boss Marathi 5 चे पर्व पहिल्या दिवसापासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. कधी घरात होणाऱ्या टास्कमुळे तर कधी घरातील सदस्यांच्या भांडणामुळे ‘बिग बॉस’च्या घराची कायमच चर्चा होत असते. या घरात आल्यापासून स्पर्धकांचे एकमेकांबरोबरचे वाद होताना पाहायला मिळत आहे. एकमेकांबरोबरचे मतभेद आणि वाद यामुळे बिग बॉस मराठीची कायमच चर्चा होताना पाहायला मिळते. अशातच या घरात जान्हवी व घन:श्याम यांची जोरदार भांडणं होताना पाहायला मिळत आहे. दोघांमधील वादाची ठिणगी ही सोमवारच्या भागातच पाहायला मिळाली. मात्र आता ही ठिणगी वाढणार असून यामुळे घरात दोघांचे जोरदार भांडण होणार आहे. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
जान्हवी व घन:श्याम यांच्या भांडणाचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर अल असून या नवीन प्रोमोमध्ये दोघे खूप भांडत असल्याचे पाहायला मिळत आहे. या भांडणादरम्यान, जान्हवी घन:श्यामला असं म्हणते की, “घरात सर्वांना माहीत आहे की, तुझ्यात अक्कल नाहीये. तुला अख्ख्या घराने नॉमिनेट केलं”. यावर घन:श्याम अस म्हणतो की, “मला काहीही फरक पडत नाही तू जेलमध्ये राहून आली”. यावर जान्हवी पुन्हा त्याला ‘बावळट’ व अक्कलशून्य म्हणते आणि यावर घन:श्यामही तिला “तुझ्याइतका नाही” असं म्हणते.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सहाव्या आठवड्यात ‘हे’ स्पर्धक झाले नॉमिनेट, कोण घराबाहेर जाणार? आणि कोण सुरक्षित होणार?
‘बिग बॉस’च्या सोमवारच्या भागात घन:श्याम व जान्हवी यांच्यात वाद झाला होता. जान्हवीने त्याला तुला लाज आहे का?” असं म्हटलं होतं. यावर चहोता पुढारीने “आता तुझ्याकडून तेवढंच शिकायचं राहिलं आहे. बाकी सगळं शिकलो आहे. तुझ्याकडे थोडी लाज शिल्लक आहे. म्हणजे मला ती लाज घेता येईल” असं म्हटलं. यापुढे दोघांमध्ये खूपच वादावादी झाली आणि याच वादाचे पडसाद आजच्या भागातही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नवीन प्रोमोमधून दोघांमधील वाद कोण मिटवणार का? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, दरम्यान, सोमवार, २ सप्टेंबरला नॉमिनेशन टास्क पार पडला. या नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत या सात सदस्यांना घरातल्या इतर सदस्यांनी नॉमिनेट केलं. त्यामुळे आता या सात सदस्यांपैकी या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.