शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : निक्कीने अरबाजला वैभव विरोधात भडकवलं, मित्रांमध्ये फूट, म्हणाली, “तुझ्यावर तो जळतो आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 4, 2024 | 12:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Nikki Tamboli tells Arbaaz Patel that Vaibhav Chavan is jealous on us see the details

Bigg Boss Marathi 5 मध्ये वैभवला निक्की व अरबाजबद्दल jealousy वाटते अशी निक्कीची समजूत आहे

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा आठवडा नुकताच सुरु झाला आहे. या आठवड्यात बीबी करन्सीसाठी घरातील सदस्यांना ‘BB फार्म’ हा नवीन टास्क देण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही टीमला नळावर दूध जमा करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र, यावेळी ‘बिग बॉस’कडून काहीशा वेगळ्या टीम विभागण्यात आल्या आहेत. एका टीममध्ये निक्की, धनंजय, अरबाज, पॅडी, घन:श्याम हे सदस्य आहेत आणि यांचा संचालक अभिजीत आहे. तर, दुसऱ्या टीममध्ये आर्या, अंकिता, सूरज, जान्हवी व वैभव हे सदस्य आहेत आणि या टीमचा सदस्या वर्षा उसगांवकर आहेत. ‘BB फार्म’ या नवीन टास्कला सोमवारच्या भागात सुरुवात झाली. मात्र नियम मोडून हा खेळ खेळल्यामुळे ‘बिग बॉस’ने हा टास्क रद्द केला. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

गेल्या आठडव्यात अरबाज विरुद्ध निक्की असा खेळ होता. मात्र आठडव्याच्या शेवटी या दोघांमधले मतभेद संपले आणि दोघे एकत्र आले. हे दोघे एकत्र आले असले तरी त्यांचा ग्रुप एकत्र आलेला नाही. या टीममध्ये जान्हवी व वैभव हे दोघे होते. पण निक्कीने हा ग्रुप तोडला आहे. त्यामुळे आता या निक्की-अरबाज विरुद्ध वैभव-जान्हवी असा खेळ या घरात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या टीममधील निक्की व वैभवचे वादही या घरासाठी नवीन नाहीत. या दोघांमध्ये अनेकदा काहीना काही कारणावरुन खटके उडाले आहेत. अशातच आजच्या भागात निक्की अरबाजकडे वैभवबद्दलची गॉसिप करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : BB फार्ममधून दूध मिळवण्यासाठी स्पर्धक पुन्हा एकमेकांना भिडले, कुणी धक्काबुक्की केली तर कुणी अरेरावी, नवीन प्रोमो व्हायरल

आजच्या भागात निक्की व अरबाज एकत्र बसलेले असतात. तेव्हा निक्की अरबाजला वैभवबद्दल असं म्हणते की, “वैभवला माझ्यावर राग नाही त्याला jealousy आहे. तुझ्यावर आणि माझ्यावरही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्यामुळे त्याला jealousy आहे. सगळ्यात आधी हे की, गेममध्ये तुझं वैभवपेक्षा जास्त डोकं चालतं. तू गेममध्ये दिसतो. तू जे करत आहे, ते दिसून येत नाही. वीकेण्डच्या वारलादेखील त्यालाच शिव्या पडतात. तुझी नकारात्मक का होईना पण चर्चा तरी होते. पण त्याची काहीच चर्चा होत नाही. त्याच्यावर लागलेला ‘अरबाज-२’चा टॅग काही केल्या हटत नाहीये. त्यामुळे त्याला स्वत:बद्दल असुरक्षितता व Jealousy वाटते. तो या शोमध्ये आतापर्यंत फक्त त्याच्या बॉडीमुळेच आहे बाकी काही नाही”.

आणखी वाचा – Video : पिकनिकमध्ये संतोषने एकट्यानेच केलं काम, त्याची अवस्था पाहून कुशलला हसू आवरेना, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “सगळ्यांची काळजी…”

आजच्या भागात होणाऱ्या ‘BB फार्म’ टास्क मध्ये कोण कुणाला किती भारी पडणार? कुणाच्या डेअरीमध्ये अधिक दूध जमा होणार? यामुळे कुणाला अधिक BB करन्सी मिळणार? हे टास्कच्या अंती पाहायला मिळणार आहे. तसेच ‘बिग बॉस मराठी’च्या या ‘BB फार्म’ टास्कमधून दोन्ही टीममधले कोणते सदस्य बाद होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, सदस्यांना ‘BB फार्म’चा कारभार सांभाळताना पाहून प्रेक्षकांचं मात्र चांगलच मनोरंजन होणार आहे.

Tags: Arbaaz Patelbigg boss marathi 5nikki tamboliVaibhav Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 nikki tamboli and jahnavi killekar fight promo viral

Bigg Boss Marathi : "निर्लज्ज, फुकटचं खाते आणि…", जान्हवी व निक्कीचा वाद टोकाला, जेवणालाही मदत करेना, म्हणाली, "गळाच पकडेन जर..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.