मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “निर्लज्ज, फुकटचं खाते आणि…”, जान्हवी व निक्कीचा वाद टोकाला, जेवणालाही मदत करेना, म्हणाली, “गळाच पकडेन जर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 4, 2024 | 12:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi Season 5 nikki tamboli and jahnavi killekar fight promo viral

काम न करण्यावरुन जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळीमध्ये वाजलं, प्रोमो व्हायरल

Bigg Boss Marathi Season 5 :  ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. एकामागोमाग एक स्पर्धकांमध्ये सुरु असलेले वाद पाहणं रंजक ठरत आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरात निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर यांच्यात मैत्री पाहायला मिळाली. गळ्यात गळे घालून, एकमेकांची काळजी घेताना त्या दिसल्या. दोघीही एकमेकांशिवाय राहत नसताना आता त्यांच्यात वाद झाला आहे. निक्की कॅप्टन झाल्यानंतर तिची वागणूक बदललेली जान्हवीला खटकली. आणि यावरुन जान्हवीने अरबाजसह गॉसिप केलं. हे गॉसिप भाऊच्या धक्क्यावर पाहून निक्कीला खूप मोठा धक्का बसला.

निक्कीला टिमने केलेली गद्दारी सहन झाली नाही म्हणून तिने टीम ए मधून एक्झिट घेतली. आणि तिने जान्हवीबरोबरची मैत्रीही तोडली. त्यानंतर निक्की व जान्हवी यांच्यात बरेचदा वाद झालेला पाहायला मिळाला. निक्की व जान्हवी यांच्यात झालेला वाद हा वाढत गेला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या भागात निक्कीने नॉमिनेशन प्रक्रियेत चुकीचा निर्णय घेतल्याने कॅप्टन वर्षा यांनी साथ दिली नसल्याचं कारण देत घरात कोणतंच काम न करण्याचा निश्चय केला.

आणखी वाचा – आयसीयुमध्ये आहे बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री, आर्थिक संकटामुळे खर्चही परवडेना, कलाकारांकडून मदतीचा हात अन्…

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

निक्कीचा हा निर्णय कोणालाच पटला नाही. निक्कीच्या विरोधात संपूर्ण घर उभं राहील. काही स्पर्धकांनी निक्कीला समजावलं मात्र निक्कीने कोणाचंच म्हणणं ऐकलं नाही. आणि ठामपणे घरातील सगळी काम न करण्याचं सांगत सोफ्यावर बसून राहिली. यानंतर आता एक प्रोमो समोर आला आहे, या प्रोमोमध्ये निक्की व जान्हवी यांच्या वाद झालेला पाहायला मिळत आहे. कोणतंच काम न करणाऱ्या निक्कीला घरातील जेवण जेवण्याचा, राशन वापरण्याचा अधिकार नाही असं जान्हवीने या वादाद्वारे म्हटलं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तिने ‘बिग बॉस मराठी’ विकत घेतलंय का?”, धक्काबुक्की, घरात काम न करण्यावरुन निक्कीवर प्रेक्षकांचा राग, म्हणाले, “आवरा हिला…”

प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, जान्हवी म्हणते, “घे बनव स्वतःच्या हाताने आणि गिळ”. यावर निक्की म्हणते, “कोण आहे गं तू. चल निघ. माझ्या वाकड्यात गेलं तर मी कसा त्यांचा गळा पकडते हे माझ्याकडून शिकावं”. यावर जान्हवी असं बोलताना दिसत आहे की, “ती तर निर्लज्जच आहे. तिला सर्व फुकटच पाहिजे. थोडीतरी लाज असेल तर मी बनवलेलं दुसऱ्या ताटातलं ती खाणार नाही”.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5nikki tamboli and jahnavi killekar fight
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Marathi actor Prasad Oak shared a special post for his son for he gifted him a new car see the details

"मुलगा असूनही बाप झालास आणि…", लेकाने महागडी गाडी गिफ्ट केल्यानंतर प्रसाद ओक भावुक, म्हणाला, "अत्यंत अभिमान…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.