Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा सहावा आठवडा नुकताच सुरु झाला आहे. या आठवड्यात बीबी करन्सीसाठी घरातील सदस्यांना ‘BB फार्म’ हा नवीन टास्क देण्यात आला आहे. यामध्ये दोन्ही टीमला नळावर दूध जमा करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र, यावेळी ‘बिग बॉस’कडून काहीशा वेगळ्या टीम विभागण्यात आल्या आहेत. एका टीममध्ये निक्की, धनंजय, अरबाज, पॅडी, घन:श्याम हे सदस्य आहेत आणि यांचा संचालक अभिजीत आहे. तर, दुसऱ्या टीममध्ये आर्या, अंकिता, सूरज, जान्हवी व वैभव हे सदस्य आहेत आणि या टीमचा सदस्या वर्षा उसगांवकर आहेत. ‘BB फार्म’ या नवीन टास्कला सोमवारच्या भागात सुरुवात झाली. मात्र नियम मोडून हा खेळ खेळल्यामुळे ‘बिग बॉस’ने हा टास्क रद्द केला. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
गेल्या आठडव्यात अरबाज विरुद्ध निक्की असा खेळ होता. मात्र आठडव्याच्या शेवटी या दोघांमधले मतभेद संपले आणि दोघे एकत्र आले. हे दोघे एकत्र आले असले तरी त्यांचा ग्रुप एकत्र आलेला नाही. या टीममध्ये जान्हवी व वैभव हे दोघे होते. पण निक्कीने हा ग्रुप तोडला आहे. त्यामुळे आता या निक्की-अरबाज विरुद्ध वैभव-जान्हवी असा खेळ या घरात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या टीममधील निक्की व वैभवचे वादही या घरासाठी नवीन नाहीत. या दोघांमध्ये अनेकदा काहीना काही कारणावरुन खटके उडाले आहेत. अशातच आजच्या भागात निक्की अरबाजकडे वैभवबद्दलची गॉसिप करणार आहे.
आजच्या भागात निक्की व अरबाज एकत्र बसलेले असतात. तेव्हा निक्की अरबाजला वैभवबद्दल असं म्हणते की, “वैभवला माझ्यावर राग नाही त्याला jealousy आहे. तुझ्यावर आणि माझ्यावरही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्यामुळे त्याला jealousy आहे. सगळ्यात आधी हे की, गेममध्ये तुझं वैभवपेक्षा जास्त डोकं चालतं. तू गेममध्ये दिसतो. तू जे करत आहे, ते दिसून येत नाही. वीकेण्डच्या वारलादेखील त्यालाच शिव्या पडतात. तुझी नकारात्मक का होईना पण चर्चा तरी होते. पण त्याची काहीच चर्चा होत नाही. त्याच्यावर लागलेला ‘अरबाज-२’चा टॅग काही केल्या हटत नाहीये. त्यामुळे त्याला स्वत:बद्दल असुरक्षितता व Jealousy वाटते. तो या शोमध्ये आतापर्यंत फक्त त्याच्या बॉडीमुळेच आहे बाकी काही नाही”.
आजच्या भागात होणाऱ्या ‘BB फार्म’ टास्क मध्ये कोण कुणाला किती भारी पडणार? कुणाच्या डेअरीमध्ये अधिक दूध जमा होणार? यामुळे कुणाला अधिक BB करन्सी मिळणार? हे टास्कच्या अंती पाहायला मिळणार आहे. तसेच ‘बिग बॉस मराठी’च्या या ‘BB फार्म’ टास्कमधून दोन्ही टीममधले कोणते सदस्य बाद होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, सदस्यांना ‘BB फार्म’चा कारभार सांभाळताना पाहून प्रेक्षकांचं मात्र चांगलच मनोरंजन होणार आहे.