मनोरंजनविश्वात कलाकार मंडळी एकमेकांसोबत काम करत असतानाच एकमेकांचे जिगरी दोस्तही होऊन जातात. दिवसातला बराचसा वेळ सेटवर एकत्र घालवल्यामुळे त्यांच्यात झालेली मैत्री घट्ट असते. मराठी सिनेविश्वातलं असाच एक मैत्रीचा ग्रुप म्हणजे म्हणजे अभिनेता संतोष जुवेकर, अभिनेता कुशल बद्रिके अभिनेता अभिजीत चव्हाण आणि दिग्दर्शक विजू माने. हे चौघे मित्र त्यांच्या ‘स्ट्रगलर साला’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांच्यातील मैत्री प्रत्येकाला आपलीशी वाटते. हे चौघे मित्र सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्यातले धमाल, मजामस्तीचे क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच कुशलने एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या व्हिडीओतून कुशल, विजू, अभिजीत व संतोष यांची मजामस्ती पाहायला मिळत आहे. (Kushal Badrike Shared Picnic Video)
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून कुशल बद्रिकेकडे पाहिले जाते. तो कायम विविध कारणांनी चर्चेत असतो. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून त्याला ओळखले जाते. त्याच्या विनोदाच्या टायमिंगला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत असतात. अशातच त्याने शेअर केलेला नवीन व्हिडीओ चर्चेत आहेत. या व्हिडीओमध्ये हे चौघे मित्र कोणत्या तरी फार्महाऊसवर पिकनिकसाठी गेले असून यात सर्व जण एन्जॉय करत आहेत. मात्र संतोष जुवेकर एकटा सर्व काम करत आहे. कुशलने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये संतोष सर्व सामान आणताना पाहायला मिळत आहे. तर कुशल त्याचा व्हिडीओ काढत आहे.
संतोष, विजू व अभिजीत यांचा हा व्हिडीओ शेअर करत कुशलने असं म्हटलं आहे की, “पिकनिकमध्ये एक मित्र तरी असा असतोच जो कायम सगळ्यांची काळजी घेतो ठिकाण शोधण्यापासून सगळ्यांच्या सामानाची जबाबदारीसुद्धा त्याच्यावरच येते. आमच्यात ती भूमिका पार पाडणारा संतोष आहे आणि तीच भूमिका “पारऽऽऽ पाडणारा” बाबा (अभिजीत चव्हाण) आहे”. कुशलने संतोषसाठी हा खास व्हिडीओ केला असून तो एकटाच या व्हिडीओमध्ये काम करताना पाहायला मिळत आहे. अभिजीत एकीकडे फोनवर बोलण्यात मग्न आहे तर विजू माने टीव्ही बघण्यात आणि कुशल या सर्वांचे व्हिडीओ बनवण्यात.
दरम्यान, कुशल, संतोष, विजू व अभिजीत हे मित्र पावसाळी पिकनिकनिमित्त फार्महाऊसवर गेले असून त्यांच्यातील खास मजामस्ती कुशलने या व्हिडीओमधून दाखवली आहे. त्यांच्या या खास क्षणांना अनेक चाहत्यांनी रिलेट केलं आहे. ,या व्हिडीओखाली अनेकांनी हसण्याच्या इमोजीद्वारे कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.