Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच रंगतदार टास्क पार पडत असतात. सदस्यांसाठी यंदाचा आठवडा खूपच कठीण आहे. या आठवड्यात घरात अनेक कठीण टास्क पार पडणार आहेत. आपलं स्थान टिकवण्यासाठी स्पर्धकांना टास्कमध्ये त्यांचा उत्तम परफॉर्मन्स द्यावा लागतो. त्यामुळे टास्कमध्ये आपले शंभर टक्के देण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतो. अशातच ‘बिग बॉस’ने नुकताच घरातील सदस्यांना एक नवीन टास्क दिला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य BB फार्मचा कारभार सांभाळताना दिसले. मंगळवारच्या भागात या BB फार्म टास्कची सुरुवात झाली. मात्र खेळ नीट खेळला न गेल्यामुळे ‘बिग बॉस’ने BB फार्मचा टास्क रद्द केला. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
वैभव, अरबाज, सूरज, जान्हवी, घन:श्याम, निक्की, आर्यासह अनेक सदस्य आक्रमकपणे टास्क खेळले. त्यांचा आक्रमकपणा पाहून ‘बिग बॉस’ने सदस्यांना चांगलीच शिक्षा सुनावली. ‘बिग बॉस’ने आखून दिलेल्या नियमांनुसार हा खेळ खेळला गेला नाही. त्यामुळे बिग बॉसने नाराज होत हा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. खेळाचे निकष न ओळखता व त्यानुसार टास्क पूर्ण न करता केवळ आक्रमकपणा दाखवला गेला यामुळे हा टास्क रद्द करत ‘बिग बॉस’ने दोन्ही टीमला शिक्षादेखील दिली. तसंच या टास्कचे नियम बदलले.
अशातच आता पुन्हा या टास्कचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यात स्पर्धक पुन्हा एकमेकांना भिडलेले पाहायला मिळत आहेत. या निक्की व आर्या एकमेकींना म्हैस म्हणत आहेत. तर सूरज व जान्हवी हे प्रतिस्पर्धी टीमला भिडत आहेत. तर अरबाजही आर्यावर मोठ्या आवाजात ओरडत आहे. एकूणच बिग बॉसने आक्रमकता न दाखवता खेळायला सांगितलेल्या टास्कमध्ये स्पर्धकांकडून पुम्हां एकदा आक्रमकताच पाहायला मिळत आहे.
त्यामुळे आता BB फार्म टास्क मध्ये कोण कुणाला किती भारी पडणार? कुणाच्या डेअरीमध्ये अधिक दूध जमा होणार? यामुळे कुणाला अधिक BB करन्सी मिळणार? हे टास्कच्या अंती पाहायला मिळणार आहे. तसेच ‘बिग बॉस मराठी’च्या या BB फार्म टास्कमधून दोन्ही टीममधले कोणते सदस्य बाद होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, सदस्यांना BB फार्मचा कारभार सांभाळताना पाहून प्रेक्षकांचं मात्र चांगलच मनोरंजन होणार आहे.