शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “निक्की ‘बिग बॉस’ची लाडकी आहे का?”, निक्कीची आरेरावी पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, “तिला शिक्षा द्या नाहीतर…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 5, 2024 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates netizens expressed their anger on Nikki Tamboli behavoiur in the house

Bigg Boss Marathi 5 मध्ये निक्कीने इतर सदस्यांशी केली अपमानास्पद वागणूक, नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे व्यक्त केला संताप

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या तूफान चर्चेत आहे. घरातील स्पर्धकांमधील मैत्रीचं समीकरण आता बदललं आहे. पहिल्या दिवसापासून तयार झालेले ग्रुप आता फुटताना दिसून येत आहेत. या स्पर्धेत निक्की तांबोळी सध्या सर्वाधिक चर्चेत असणारी स्पर्धक ठरत आहे. अरबाज-निक्की ही जोडी संपूर्ण घराविरोधात लढत देताना दिसत आहे. त्यातच वर्षा उसगांवकर यांच्याबद्दल निक्की सतत काही न काही बोलतानाचे पाहायला मिळत आहे. निक्की कॅप्टन वर्षा यांना “मी वॉशरुम स्वच्छ करणार नाही” असं सांगते. यामागे “सूरजने निकष समजून न घेता मला नॉमिनेट केलं. तुम्ही माझ्यासाठी स्टॅण्ड घेतला नाही त्यामुळे मी घरात ड्युटी करणार नाही” असं कारण ती वर्षा यांना देते. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

बुधवारच्या भागात निक्कीने वाद घालताना अगदी परिसीमा गाठली. निक्कीने वर्षा यांच्याबद्दल अपशब्द वापरले. ” मला अडवणारा अजून जन्माला आलेला नाही. तुम्ही मला हुकूम देऊ नका. कॅप्टन आहात, तर कॅप्टनच राहा. इथे बादशाह नका होऊ. माझा बाप बनू नका. समजलं ना? कॅप्टनच्या हैसियतमध्ये राहा”. तसंच जान्हवीने तिला जेवण न दिल्यामुळेदेखील तिने बोलताना अनेकदा “हे घर कुणाच्या बापाचे नाही” असं म्हटलं. यावर डीपी दादांनी टिचे कान टोचलेच. मात्र आता निक्कीच्या या वागण्यावर नेटकऱ्यांनीदेखील तोंडसुख सोडलं आहे. नेटकऱ्यांनी निक्कीबद्दलची त्यांची नाराजी सोशल मीडियावर कमेंट्सद्वारे व्यक्त केली आहे.  

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – हेमंत ढोमेच्या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा, स्वतःच्याच गावात शूट केला चित्रपट, म्हणाला, “आपल्या भागातले लोक…”

एका नेटकऱ्याने याबद्दल असं म्हटलं आहे की, “कलर्स मराठीला विनंती आहे. ‘बिग बॉस’ शो चालवत आहेत खुप छान गोष्ट आहे. परंतु यातून महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्मितेशी खेळत आहात हे लक्षात ठेवा. कोणाचा आई व बाप काढणे चुकीच आहे. अशा सदस्यांना आपला पाठिंबा दिसुन येत आहे. हा महाराष्ट्रात आहे आणि इथे असले फालतु चाळे चालु दिले जात नाहीत. आपण योग्य तो निर्णय घ्याल हिच अपेक्षा आहे. अन्यथा ‘बिग बॉस’चं घर उध्द्वस्त झाल तर सर्व जबाबदारी तुमचीच राहील”. तसंच एकाने “यावेळी जर नक्कीला भाऊचा धक्का नाही दिला तर हा निक्कीचाच ‘बिग बॉस’ समजेल” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने “धक्के देणे, केस ओढणे, बोचकरे घेणे, कपडे फाडने अश्या गोष्टी निक्की नेहमी करते, हा खेळ खेळण्याचा प्रकार नाही. यासाठी तिला शिक्षा झालीच पाहिेजे” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अंकिता व अभिजीतची मोठी प्लॅनिंग, वर्षा उसगांवकर दुखापतीचे नाटक करणार, एवढा गेम प्लॅन कशासाठी?

तसंच “निक्की ‘बिग बॉस’ची लाडकी आहे का?? ती कोणाच्याही बापावर जाते, कॅपटनचं ऐकत नाही, नियम मोडते, तरीही तिच्यासाठी स्पेशल चहा का?”, “यावेळेस नक्की जर घराबाहेर निघली नाही तर समजून जा हा बिग बॉस केवळ नक्कीच आहे मराठी प्रेक्षकांची नावे घेऊन सर्व मराठी माणसांना कलर्स मराठी फसवत आहे”, “खरचं कोणाच्या आई बापा वरून जाणे चुकीचे आहे…हे असं चालू राहिले तर त्या मध्ये कलर्स मराठी आणि बिग बॉस मराठीचे नाव खराब होतेच. पण त्याबरोबरच मराठी संस्कृती पण खालावलेली दिसते” अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी आपली नाराजी व राग व्यक्त केला आहे.   

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 daily updatesnikki tamboli
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi season 5 nikki and abhijit fight

Bigg Boss Marathi : निक्की-अभिजीतचे एकमेकांवर आरोप, घरातील इतर सदस्यांनी उडवली खिल्ली, अंकिता म्हणाली, "दोघात तिसरा आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.