Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांचा कल्ला वाढलेला पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची जितकी चर्चा होते. तितकीच या घरातील टास्कची सुद्धा. घरातील स्पर्धकांसाठी बिग बॉस एकाहून एक आव्हानात्मक टास्क घेऊन येत असतात. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवीन टास्क आणि नवीन राडा पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा नव्याने कॅप्टन्सी टास्क पार पडणार आहे. यामध्ये घरातील सर्व सदस्यांचा कल्ला, राडा, गोंधळ आणि धिंगाणा पाहायला मिळेल. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. या आठवड्यात वर्षाताई कॅप्टन आहेत. पुढील आठवड्याच्या कॅप्टन्सीकडे घरातील सदस्यांचं लक्ष लागलं आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टन्सी टास्कसाठी स्टॉपवरुन कॅप्टन्सी कंटेन्डरची बस सुटणार आहे यातून घरातील सदस्यांना घरासाठी नवीन कॅप्टन निवडायचा आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांना बसमधील सीटवर जाऊन बसायचं असतं. त्यामुळे या नवीन टास्कसाठी स्पर्धकांमध्ये चांगलीच रणनीती आखली जात आहे आणि या रणनीतीमध्ये निक्की जान्हवीविरुद्ध प्लॅनिंग करताना पाहायला मिळणार आहे. तर अंकितादेखील या टास्कसाठी विरुद्ध टीमसाठी रणनीती करणार आहेत आणि यासाठी ते वर्षा उसगांवकर यांना पाय मुरगळळा असल्याचे नाटक करायला सांगणार आहेत. वर्षा यांच्याबद्दल अंकिता व अभिजीत प्लॅनिंग करतात.
आणखी वाचा – इतकी सुंदर व गोंडस दिसते सई लोकुरची लेक, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, म्हणाली, “आई म्हणून माझा…”
यावेळी अंकिता वर्षा ताईंचा पाय मुरगळा असल्याचे नाटक करावे लागेल असं म्हणते. याबद्दल अंकिता वर्षा यांना असं म्हणते की, “तुम्हाला चुकून पडायला लागेल. त्यांना (विरुद्ध टीम) इतकं डोक चालवता येणार नाही, त्यामुळे आपल्यालाच डोकं चालवून तुम्हाला तिकीट कलेक्टर बनवावं लागेल आणि घन:श्यामलासुद्धा काहीही करून बसवावं लागेल. त्यामुळे तुमचा पाय मुरगळला आहे या प्लॅनसाठी आपल्याला तयारी करावी लागेल”. यावर वर्षा उसगांवकरदेखील त्यांना होकार देतात.
त्यामुळे आता अंकिताच्या प्लॅनप्रमाणे वर्षा उसगांवकर टास्कमध्ये पाय मुरगळल्याचे नाटक करणार का? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात दूध गोळ्या करण्याच्या टास्कमध्ये स्पर्धकांची बाचाबाची होते. दुसऱ्या फेरीत आर्या व निक्कीमध्ये झटापट झाल्यामुळे ‘बिग बॉस’ ती फेरी रद्द करतात. त्यानंतर तिसऱ्या फेरीत निक्कीने टास्कचा खेळ-खंडोबा करते. यामुळे ‘बिग बॉस’ ते कार्य रद्द करतात. त्यामुळे आता सदस्यांना नवीन टास्क देणार आहेत.