शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : निक्की-अभिजीतचे एकमेकांवर आरोप, घरातील इतर सदस्यांनी उडवली खिल्ली, अंकिता म्हणाली, “दोघात तिसरा आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 5, 2024 | 4:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi season 5 nikki and abhijit fight

निक्की व अभिजीतमध्ये झाला टास्कवरुन कल्ला, प्रोमो व्हायरल

Bigg Boss Marathi season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं घर म्हटलं की वाद हे आलेच. यंदाच्या पर्वात आलेले स्पर्धक प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसत आहेत. यंदाच्या पर्वात केवळ कलाकार मंडळीच नव्हे तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, गायक, अभिनेते, अभिनेत्री, रॅपर अशा विविध क्षेत्रातील कलाकार मंडळींना संधी मिळाली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातून आलेले हे स्पर्धक साऱ्यांच्या पसंतीस पडत आहेत. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून कलाकारांची भांडण पाहायला मिळाली. यंदाच्या ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात एका स्पर्धकाची विशेष चर्चा रंगलेली दिसली ही स्पर्धक म्हणजे निक्की तांबोळी.

निक्कीने तिच्या अरेरावीपणाने ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घातला. निक्कीने स्पर्धकांशी मैत्री केली तर अनेकदा दुष्मनी केली. निक्की व अरबाजची मैत्री सध्या घरात पाहायला मिळत आहे. तर अभिजीत व निक्की यांच्यातही काही काळ मैत्री पाहायला मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात टास्क दरम्यान निक्की व अभिजीत पुन्हा भांडताना दिसले. निक्कीला अभिजीतने दिलेले ज्ञान खटकले असल्याचं सांगितलं. शिवाय अभिजीतची शाळा घेत निक्कीने त्याची बोलती बंद केली. मात्र याला अभिजीतनेही सडेतोड उत्तर दिलं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “मी तुझ्यासारखी रिकामी नाही”, नको त्या मुद्द्यावरुन अभिजितशी वाद घालतेय निक्की, नक्की सिद्ध करायचंय काय?

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अशातच अभिजीत व निक्की यांचा एका टास्क दरम्यानचा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये निक्की अभिजीतला म्हणते, “तू डबलढोलकी आहेस”. यावर अभिजीत म्हणतो, “तुम्ही तुमचे शब्द जपून वापरा”. यावर निक्की अभिजीतला म्हणते, “तू तुझी सोच ठिकाण्यावर ठेव”. हा वाद पाहून डीपी म्हणतो, “२२ कॅमेरे हे तुमच्यावर आहेत. थांबा आता”. तर अंकिता ओरडून सांगते, “आता या कॅप्टन्सीचं एक वेगळं नाव असेल दोघात तिसरा आता कॅप्टन्सी विसरा”.

आणखी वाचा – हेमंत ढोमेच्या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा, स्वतःच्याच गावात शूट केला चित्रपट, म्हणाला, “आपल्या भागातले लोक…”

निक्की व अभिजीत यांच्यात प्रोमोवरुन वाद झालेला पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, निक्की अभिजीतला म्हणते, “तू मला सांगू नकोस. शब्द जपून वापर, मुद्दे कसे मांडत आहेस. तुलाही माहित आहे की या घरात अगदी पहिल्या दिवसापासून मुद्दे मांडत आहे. तू मला म्हटलं शब्द जपून वापर”. यावर अभिजीत वाद घालत म्हणतो, “मी कुठे नाही म्हटलं. कारण त्याच्याआधी तू मला म्हणाली शब्द जरा जपून वापर. तुला कळत नाही का? असंही तू मला म्हणाली. आणि त्याच्यावर मी तुला उत्तर दिलं”. यावर निक्की म्हणते, “मी वैयक्तिक मुद्द्यावर बोलले. तू चुकीचा अर्थ घेतला”.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5nikki and abhijit fight
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Sai Lokur Birthday

Video : नवरा असावा तर असा! सई लोकुरला नवऱ्याने वाढदिवसाला दिलं हटके सरप्राइज, एक चिट्ठी निवडायला सांगितली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.