गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : जान्हवी-निक्कीच्या निर्णयामुळे डीपी ठरला पराभूत, बायको व आई भडकली, म्हणाली, “त्याचा खेळ जनतेने बघितला पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 30, 2024 | 12:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 dhananjay powar wife and mother angry

'बिग बॉस मराठी'मधील टास्क पाहून धनंजय पोवारच्या आई व पत्नीचा संताप

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील पाचवा आठवडा सुरु असून स्पर्धक मंडळी विशेष धुमाकूळ घालताना दिसत आहेत. मात्र गेल्या आठवड्यातील भाऊच्या धक्क्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरातील समीकरणे काहीशी बदललेली दिसली. नुकताच ‘बिग बॉस’च्या घरात ‘पाताळ लोक’ टास्क पार पडला. या टास्कमध्ये ‘ए’ टीममध्ये निक्की-अभिजीत, घन:श्याम – पॅडी, वैभव-धनंजय या जोड्या होत्या. तर ‘बी’ टीममध्ये जान्हवी-सूरज, अरबाज-आर्या, अंकिता-वर्षा या जोड्या होत्या. पण या टास्कमधील पहिल्या फेरीमध्येच वाद झाले. ‘पाताळ लोक’ टास्कमधील पहिली फेरी खेळण्यासाठी ‘ए’ टीममधून वैभव-धनंजय गेले होते.

टास्कदरम्यान, अरबाजकडून बॉक्स तुटला म्हणून पहिल्या फेरीच्या संचालक असलेल्या निक्कीने ‘बी’ टीमने जमा केलेली नाणी ग्राह्य धरली नाहीत. त्यामुळे ‘ए’ टीमच्या संचालक जान्हवीनेही बॉक्स फोडला आणि त्यांची नाणी सुद्धा ग्राह्य धरली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. या फेरीत धनंजयने पाताळा लोकातून सर्वाधिक नाणी आणली होती. पण संचालकामुळे धनंजयची ही मेहनत फुकट गेल्याने त्याच्या आई व पत्नीने आपल्या भावना व्यक्त करत व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीला थंडी लागताच अभिजीतने काढून दिले स्वत:चं जॅकेट, डीपी-अंकिता हसू लागले अन्…; नक्की चूक कोणाची?

View this post on Instagram

A post shared by Dhananjay Powar (@dhananjaypowar_dp)

या व्हिडीओमध्ये धनंजयची पत्नी म्हणते की, “ए टीम आणि बी टीम होती. यांत ‘ए’ टीमकडून ते अगदी जीव तोडून खेळत होते. वैभव आणि त्यांची जोडी खेळत होती. अरबाजच्या हातून बॉक्स पडला आणि तुटला. इथे चूक दुसऱ्या टीमची नव्हती. त्यांची स्वतःची होती. त्यांच्या हातून डबा फुटला होता. निक्की म्हणाली, ती नाणी ग्राह्य धरली जाणार नाहीत. त्यांनी जीव तोडून २७ नाणी गोळा केली होती. पूर्ण त्यांनी त्यांचा खेळ दाखवला आणि तिथे आपल्याला त्यांचा खेळ दिसला आहे. त्यांनी हुशारीने खेळ खेळला”. पुढे धनंजयची आई म्हणाली, “त्याने बरोबर खेळ खेळला आहे. त्याने नाणी भरपूर गोळा केले होती. तो नाणी गोळा करुन वैभवकडे देत होता. खेळता खेळता अरबाजचा बॉक्स पडला आणि फुटला. आमचा धनंजय कसा खेळतोय हे जनतेने बघितलं आहे. आम्ही पण बघितलं आहे. जनतेला काय वाटतं त्यांनी सांगा”

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अरबाज-निक्की एकत्र आल्यानंतर प्रेक्षकांनी टीम बी व जान्हवी-वैभवला सुनावलं, म्हणाले, “हेच बघून तुम्ही आता…”

त्यानंतर धनंजयची पत्नी म्हणाली, “यासंदर्भात तुम्ही कमेंटमध्ये कळवा. अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन आली पाहिजे. तुम्ही कमेंटमध्ये कोण बायस्ट खेळलं? कोण चांगलं खेळलं? कोणी १०० टक्के दिलं? हे आम्हाला कळवा. आम्हाला संचालक चुकीचे लाभले. एकाबाजूला निक्की आणि दुसऱ्याबाजूला जान्हवी. दोघी ‘ए’ टीमच्या निघाल्या, आमची ‘बी’ टीम बिचारी पडली. त्यामुळे त्यांची आधीची ‘बी’ टीम एकत्र आली तर नव्वल वाटून घ्यायचं नाही. कारण ते एकत्र येणारच आहेत”

Tags: bigg boss marathi 5dhananjay powardhananjay powar wife video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kumar fitness :
Lifestyle

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने १५ वर्षांपासून खाल्ला नाहीय समोसा, वयाच्या ५९ व्या वर्षी आहे इतका फिट, कारण आहे…

एप्रिल 16, 2026 | 11:00 am
Reasons For Sugar Cravings 
Lifestyle

जेवणानंतर आपल्याला मिठाई का हवी असते?, आयुर्वेदात दडलंय याचं रहस्य, वाचा सविस्तर

एप्रिल 16, 2026 | 10:10 am
Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Next Post
kriti sanon rumoured boyfriend

धोनी कुटुंबियांची सून होणार क्रिती सेनॉन, नऊ वर्षांनी लहान मुलाला करत आहे डेट, कोण आहे 'ती' व्यक्ती?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.