Ishita Raj likes Hardik Pandya : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा गेल्या अनेक दिवसापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने नताशा स्टेव्हकोविचनेबरोबरच्या घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यांच्या नात्याबद्दलच्या घोषणेनंतर अनेक चाहत्यांसह सर्वांनाच धक्का बसला. नताशापासून घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिकचे नाव अनेक सेलिब्रिटींशी जोडले गेले. अभिनेत्री अनन्या पांडे व गायिका जस्मिन वालिया यांच्याबरोबर हार्दिकचे नाते जोडले गेले होते. अशातच आता स्वत: एका अभिनेत्रीने हार्दिकवरील तिचे प्रेम व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर हार्दिकसाठी कमेंट करुन ही अभिनेत्री प्रसिद्धी झोतात आली आणि ही अभिनेत्री म्हणजे ‘प्यार का पंचनामा’ फेम इशिता राज. (Ishita Raj likes Hardik Pandya News)
नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्री इशिता राजने हार्दिक पांड्यावरील तिचं प्रेम व्यक्त केले आहे. त्यामुळे आता हार्दिक व इशिता यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. इशिता राजने फिल्मीज्ञानला मुलाखती दिली आणि या मुलाखतीत इशिताने हार्दिकवरील प्रेम व्यक्त केले आहे आणि तो आवडता क्रिकेटर असल्याचेही तिने म्हटले आहे. इशिताला हार्दिकबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली की, “तो (हार्दिक) एक महान क्रिकेटर आणि अष्टपैलू खेळाडू आहे. त्याला फलंदाजी करताना पाहणे खूपच मजेदार असतं. माझे त्याच्यावर प्रेम आहे, तो माझ्या आवडत्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे”. तसंच इशिताने असेही सांगितले की, तिला हार्दिकवर क्रश आहे आणि तिला तो खूप आवडतो.
इशिताबद्दल बोलायचे झाले तर तिने बॉलिवूडमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमधून काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. अलीकडेच तिचा ‘जंगली जंगली पंजाब’ हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. याशिवाय ती ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘प्यार का पंचनामा’मधील तिच्या अभिनयासाठी विशेष ओळखली गेली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याचे नाव गायिका जस्मिन वालियाशी जोडले गेले होते. या दोघांचे सुट्ट्यांमधील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इतकेच नाही तर दोघांनीही एकमेकांच्या फोटोंवर कमेंट्सही केल्या आहेत. या दोघांनीही जरी त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं नसेल तर सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल अनेक चर्चा झाल्या. अशातच आता इशिताने तिचं हार्दिकवरील प्रेम व्यक्त केलं आहे.
दरम्यान, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक वेगळे झाले आहेत. गेल्या महिन्यातच दोघांचे चार वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले. एका बातमीनुसार, हार्दिकला खूप ग्लॅमरस लाइफ आवडते आणि नताशाला हे सर्व आवडले नाही. त्यामुळे हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. नताशा सध्या तिचा मुलगा अगस्त्यासोबत सर्बियामध्ये आहे आणि सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे