शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : अंकिता व अभिजीतची मोठी प्लॅनिंग, वर्षा उसगांवकर दुखापतीचे नाटक करणार, एवढा गेम प्लॅन कशासाठी?

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 5, 2024 | 1:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily updates Ankita and Abhijeet said Varsha to do fake drama for captaincy task

Bigg Boss Marathi 5 मध्ये कॅप्टन बनण्यासाठी अंकिता अभिजीतचा विरुद्ध टीमविरोधात गेम प्लॅन

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांचा कल्ला वाढलेला पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची जितकी चर्चा होते. तितकीच या घरातील टास्कची सुद्धा. घरातील स्पर्धकांसाठी बिग बॉस एकाहून एक आव्हानात्मक टास्क घेऊन येत असतात. अशातच आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नवीन टास्क आणि नवीन राडा पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस’च्या घरात पुन्हा नव्याने कॅप्टन्सी टास्क पार पडणार आहे. यामध्ये घरातील सर्व सदस्यांचा कल्ला, राडा, गोंधळ आणि धिंगाणा पाहायला मिळेल. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. या आठवड्यात वर्षाताई कॅप्टन आहेत. पुढील आठवड्याच्या कॅप्टन्सीकडे घरातील सदस्यांचं लक्ष लागलं आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)

‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टन्सी टास्कसाठी स्टॉपवरुन कॅप्टन्सी कंटेन्डरची बस सुटणार आहे यातून घरातील सदस्यांना घरासाठी नवीन कॅप्टन निवडायचा आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांना बसमधील सीटवर जाऊन बसायचं असतं. त्यामुळे या नवीन टास्कसाठी स्पर्धकांमध्ये चांगलीच रणनीती आखली जात आहे आणि या रणनीतीमध्ये निक्की जान्हवीविरुद्ध प्लॅनिंग करताना पाहायला मिळणार आहे. तर अंकितादेखील या टास्कसाठी विरुद्ध टीमसाठी रणनीती करणार आहेत आणि यासाठी ते वर्षा उसगांवकर यांना पाय मुरगळळा असल्याचे नाटक करायला सांगणार आहेत. वर्षा यांच्याबद्दल अंकिता व अभिजीत प्लॅनिंग करतात.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – इतकी सुंदर व गोंडस दिसते सई लोकुरची लेक, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा, म्हणाली, “आई म्हणून माझा…”

यावेळी अंकिता वर्षा ताईंचा पाय मुरगळा असल्याचे नाटक करावे लागेल असं म्हणते. याबद्दल अंकिता वर्षा यांना असं म्हणते की, “तुम्हाला चुकून पडायला लागेल. त्यांना (विरुद्ध टीम) इतकं डोक चालवता येणार नाही, त्यामुळे आपल्यालाच डोकं चालवून तुम्हाला तिकीट कलेक्टर बनवावं लागेल आणि घन:श्यामलासुद्धा काहीही करून बसवावं लागेल. त्यामुळे तुमचा पाय मुरगळला आहे या प्लॅनसाठी आपल्याला तयारी करावी लागेल”. यावर वर्षा उसगांवकरदेखील त्यांना होकार देतात.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “ग्रुपमध्ये मला शून्य किंमत आणि…”, डीपीची नाराजी, ग्रुपमध्ये राहणार नसल्याचंही अंकिताला सांगितलं, म्हणाला, “नीट उत्तरही…”

त्यामुळे आता अंकिताच्या प्लॅनप्रमाणे वर्षा उसगांवकर टास्कमध्ये पाय मुरगळल्याचे नाटक करणार का? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात दूध गोळ्या करण्याच्या टास्कमध्ये स्पर्धकांची बाचाबाची होते. दुसऱ्या फेरीत आर्या व निक्कीमध्ये झटापट झाल्यामुळे ‘बिग बॉस’ ती फेरी रद्द करतात. त्यानंतर तिसऱ्या फेरीत निक्कीने टास्कचा खेळ-खंडोबा करते. यामुळे ‘बिग बॉस’ ते कार्य रद्द करतात. त्यामुळे आता सदस्यांना नवीन टास्क देणार आहेत.

Tags: abhijeet sawantankita walawalkarKonkan Hearted Girlvarsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Marathi actor, director and producer Hemant Dhome announced his new Movie which was shot in his own village

हेमंत ढोमेच्या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा, स्वतःच्याच गावात शूट केला चित्रपट, म्हणाला, “आपल्या भागातले लोक…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.