छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री सई लोकुर सोशल मिडियावर कायम सक्रीय असते. ती नेहमीच तिच्या वैयक्तिक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. सईने बिग बॉस मराठीमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. ती काही चित्रपटातही झळकली. सईने २०२० साली तीर्थदीप रॉय याच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने इंडस्ट्रीला रामराम केला आणि संसारात रमली. त्यानंतर २०२३ मध्ये सईने गुड न्यूज देत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. लग्नाच्या तीन वर्षांनंतर १७ डिसेंबर २०२३ रोजी तिने गोंडस मुलीला जन्म दिला. सईच्या मुलीचे नाव ताशी रॉय असं आहे. (Sai Lokur Girl Face)
सई सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ती तिच्या लेकीबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसते. अशातच सईने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेली एका पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्रीने पहिल्यांदाच तिच्या मुलीचा फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. सईने याआधी तिच्या मुलीबरोबरचे काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले होते. मात्र तिने कधीच तिच्या मुलीचा चेहरा दाखवला नव्हता.
अशातच तिने आता पहिल्यांदाच खास फोटो शेअर केला आहे. सईने लेकीबरोबरचा गोंडस फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “आज माझ्या वाढदिवसाच्या या शुभ प्रसंगी, मी तुम्हाला देवाने मला दिलेल्या सर्वोत्तम भेटवस्तूची ओळख करुन देऊ इच्छिते. माझी प्रिय मुलगी ताशी. तिचा पहिल्यांदाच फोटो शेअर करत आहे. ती माझ्यासाठी जग आहे आणि मी तिच्यावर किती प्रेम करते हे मला शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आई म्हणून हा माझा पहिला वाढदिवस आहे आणि मी देवाकडे आणखी काही मागू शकत नाही. ताशी ही माझे जीवन आहे आणि ती मला मिळालेली सर्वात चांगली भेट आहे”.
दरम्यान, सईने आजवर आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनं जिंकलं. ती एक उत्तम अभिनेत्री आहेच पण त्याबरोबर ती छान नृत्यांगणाही आहे. सई ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामुळे चांगलीच चर्चेत आली होती. या कार्यक्रमामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिचा सिनेसृष्टीतील वावर बराच कमी झाला. यांपैकी एक आहे. या दघाी एक आहे.