बिग बॉस मराठी’च्या घरात चर्चेत राहिलेल्या काही नावांपैकी एक नाव म्हणजे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, बिग बॉस मराठीच्या सुरुवातीला गेम न कळणारी अंकिता कालांतराने मात्र यात बिग बॉसच्या तरेबेज झाली. रणनीती आखून आणि गेम प्लॅन करून तिने पहिल्याच फेरीत या घराचे कॅप्टनपद जिंकले. त्यानंतर ग्रुपमधील एक महत्त्वाची सदस्य म्हणून मानली गेली. तिचा खेळ आणि खेळाची समज तिला ‘बिग बॉस मराठी’च्या अंतिम फेरीपर्यंत घेऊन आली. मात्र अंतिम फेरीच्या उंबरठ्याशी येऊन तिचा प्रवास संपला. पण या एकूण प्रवासाबद्दल तिला आनंद असल्याची भावना व्यक्त केली आहे. (Bigg Boss Marathi 5 Ankita Walawalkar Angry)
कोकण हार्टेड गर्ल म्हणून अंकिता सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर ती तिचे अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असते आणि तिच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसादही मिळतो. सोशल मीडिया आणि नुकतीच ‘बिग बॉस मराठी मुळे चर्चेत आलेली अंकिता पुन्हा एकदा चर्चेचं कारण बनली आहे. अंकिताने दोन वर्षापूर्वी तिच्या मित्राबरोबर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता आणि आता त्याच व्हिडीओमध्ये ‘बिग बॉस मराठी’चे वाइल्ड कार्ड स्पर्धक संग्राम चौगुले यांचा फोटो लावून अफवा पसरवली जात आहे. त्याबद्दल अंकिताने आता स्पष्टीकरण दिलं आहे.
आणखी वाचा – अंकिता वालावलकरला होणाऱ्या नवऱ्याने दिलं मोठं सरप्राइज, फोटो पोस्ट करत म्हणाली, “नवऱ्या…”
अंकिताने व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “७० दिवसांचा ‘बिग बॉस’ करन आले असताना आणि डोक्यावर आधीच एक प्रेशर असताना एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. माझ्या मित्राबरोबर बनवलेला दोन वर्षापूर्वीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये संग्राम दादांचा फोटो लावलेला आहे आणि त्यावरुन उगाच भांडण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझं संग्रामदादांशी सुद्धा बोलणं झालं आहे. असा कोणताही व्हिडीओ मी पोस्ट केलेला नाही. तर ज्या काही अफवा आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करा”.
यापढे तिने असं म्हटलं आहे की, “मी ‘बिग बॉस’मध्ये असताना माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न झाला आहे आणि बाहेर असतानाही तो सुरु आहे, त्याबद्दल मी लवकरच तुम्हा सर्वाशी बोलणार आहे. त्या व्हिडीओची तुम्ही वाट बघा, मला थोडं माझ्या कामामधून मोकळं होऊया. मग आपण सगळे बोलू. एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्याबरोबर माझ्यासारखे खूप छान लोक जोडले गेले आहेत. मला फोन करून सांगत आहेत