‘बिग बॉस मराठी’चं यंदाचं पर्व हे विशेष चर्चेत राहिलेलं पाहायला मिळालं. यंदाच्या या पर्वात विशेषतः सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर्सची हवा असलेली पाहायला मिळाली. या पर्वात सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार या रील स्टारचा धमाका पाहायला मिळाला. तर यंदाच्या टॉप फाईव्हमध्ये या तीनही सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर्सने आपली जागा कायम राखली. तर विजेते पदावर सोशल मीडिया इन्फ्लुइन्सर्स सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं. तर चौथा क्रमांकावर धनंजय पोवार आणि पाचव्या क्रमांकावर अंकिता वालावलकर असलेली पाहायला मिळाली. (Ankita Walavalkar Post)
‘बिग बॉस’च्या घरातून आता बाहेर पडल्यानंतर सगळे स्पर्धक मंडळी आपापल्या घरी रवाना झाले आहेत. तब्बल ७० दिवस ‘बिग बॉस’च्या घरात राहिल्यानंतर आता हे स्पर्धक घराबाहेर पडले आहेत. घराबाहेर पडल्यानंतर सगळ्यांच अगदी जंगी स्वागत झालेलं पाहायला मिळालं. शिवाय या स्पर्धकांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्याची ही चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. दरम्यान, या शोमधील अंकिता वालावलकर हिच्या वैयक्तिक आयुष्याची विशेष चर्चा रंगली.
आणखी वाचा – नवरात्रीच्या सातव्या दिवशी शुभन योगामुळे धनू राशीला आर्थिक लाभ, मकर राशीच्या लोकांना व्यवसायात मिळणार यश
अंकिताने ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याआधी प्रेमाची जाहीर कबुली दिली. शिवाय ‘बिग बॉस’च्या घरात असताना तिने बाहेर आल्यानंतर प्रेमाची कबुली देणार असल्याचं सांगितलं, त्यानुसार लवकरच ती प्रेमाची कबुली देणार आहे. कोकण हार्टेड बॉय नक्की कोण असेल असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. अंकिता येत्या दसऱ्याला प्रेमाची कबुली देणार आहे. नुकतीच अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एका पोस्टने लक्ष वेधलं आहे.
यामध्ये अंकिताच्या नवऱ्याने खास तिच्यासाठी या विजयाचं जंगी सेलिब्रेशन अरेंज केलं आहे. फुग्यांचे डेकोरेशन करत त्याने हे खास सेलिब्रेशन आयोजित केलं आहे. अंकीताला तिच्या नवऱ्याकडून मिळालेलं हे खास सरप्राइज पाहुन तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिने ही पोस्ट शेअर करत “thank you नवऱ्या” असं म्हणत त्याचे आभारही मानले आहेत. सोशल मीडियावर संगीत दिग्दर्शक कुणाल भगत हा अंकिताचा होणारा नवरा असल्याची चर्चा सुरु आहे.