‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ संपलं असलं तरी या यंदाच्या या पर्वाची सर्वत्र क्रेज सुरु असलेली पाहायला मिळत आहे. या पर्वातील ज्येष्ठ कलाकार पॅडी कांबळे यांचा सहभागही विशेष चर्चेत राहिलेला पाहायला मिळाला. विशेषतः घरातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या खेळाचं सगळ्यांनीच विशेष कौतुक केलं. अशातच अभिजीत बिचुकले यांनी पॅडी कांबळेंबाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. पंढरीनाथ यांच्याबाबत बोलताना अभिजीत बिचुकले यांनी अपशब्द वापरले. ‘बिग बॉस’च्या घरात बिचुकले आले होते तेव्हा पॅडी कांबळेंनी त्यांच्या डॉक्टरेटच्या पदवीबद्दल विचारणा केली, हे बिचुकलेंना खटकलं. यावरुन अभिजीत बिचुकले आता भडकले असून ते पंढरीनाथ यांच्यावर जाहीर टीका केली. (Abhijeet Bichukale on Paddy Kamble)
‘चालु वार्ता’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना अभिजीत बिचुकलेंनी पंढरीनाथ कांबळे यांच्याबाबत केलेलं भाष्य समोर आलं आहे. ते म्हणाले, “‘बिग बॉस मराठी’ विशेष करुन अभिजीत बिचुकलेमुळे गाजलं आहे. त्याच्यानंतर मी हिंदी ‘बिग बॉस’मध्ये गेलो आणि त्यामध्ये मी कोणा-कोणाबरोबर होतो हे काही सांगायची गरज नाही. यानंतर मी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात पाहुणा म्हणून गेलो. तेव्हा ‘बिग बॉस’ म्हणाले, डॉक्टर अभिजीत बिचुकले आपलं स्वागत आहे. त्याच्यानंतर ज्याला गेली २५ वर्ष कामं नाही आहेत तो म्हणजे पॅड्या कांबळे. मला कोणते डॉक्टरेट आहात?, असं विचारतो”.
अपशब्द वापरत अनेक अपमान करत पुढे बिचुकले असं म्हणाला की, “तर पॅड्या कांबळे तुला एकच सांगतो, तू ‘बिग बॉस’चाही अपमान केला आहेस आणि माझी डॉक्टरेट विचारलीस ना. मी तुझ्यासह सर्व माध्यमांना डॉक्टरेटचे प्रमाणपत्र दाखवतो. पण तू किती पापांचा आहेस, महाराष्ट्रात तुझे किती बाप आहेत, हे सगळे बाप माझ्यापुढे घेऊन ये”. यानंतर पॅडी कांबळेला अभिजीत यांनी अपशब्द वापरत, “तुझी लायकी किती, तुझी उंची किती. मी एक दिवस ‘बिग बॉस’मध्ये असतो ना तर तुला संडासात कोंबुन फ्लश केलं असतं”.
पुढे तो असंही म्हणाला, “मी फक्त शाहरुख, आमिर, अभिजीत बिचुकले यांना ओळखतो. जे आता डॉ. अभिजीत बिचुकले आहेत. मी अवधूत गुप्तेला ओळखतो, निलेश साबळेला ओळखतो. मिलिंद इंगळेला ओळखतो. वैशाली सामंतला ओळखतो आणि श्रावणी देवधर यांना मी काकू म्हणतो. कुठलेही लुंगे सुंगे सांगितली आणि त्याचा राग धरशील. तुला एक सांगतो तू बोलला आहेस म्हणून मी बोलतो. तुझ्या घरात येऊन, तुला बोकड माहीत आहे का?. तुझ्या बापजन्मी बोकड खायला मिळालं का?, पीठमाग्या, तुला खायला अन्न नव्हतं पण तुझ्या घरात येऊन…”