Bigg Boss Marathi 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’ सीजन पाच हे पर्व विशेष लक्षवेधी ठरलं. यंदाच्या या पर्वात केवळ अभिनेते, अभिनेत्रीच नव्हे तर अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, रॅपर, गायक, नेते मंडळी यांसारख्या विविध कलाक्षेत्रातील मंडळींना खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळालेला पाहायला मिळाला. यंदाच्या या पर्वात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची हवा असलेली पाहायला मिळाली. आणि ही हवा अगदी पहिल्या दिवसापासून अगदी अंतिम सोहळ्यापर्यंत पाहायला मिळाली. यंदाच्या या पर्वाच्या विजेतेपदावरही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनेचं नाव कोरले असल्याचे दिसलं. गोलीगत फेम टिक टॉक स्टार सुरज चव्हाणने यंदाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. तर अभिजीत सावंत हा या पर्वाचा रनर अप ठरला.
एकूणच हे पर्व सोशल मीडियाच्या मदतीने विशेष उंचीवर गेलं असल्याचेही पाहायला मिळालं. यंदाच्या पर्वामध्ये सूरज चव्हाण बरोबरच अंकिता वालावलकर, धनंजय पोवार ही स्पर्धक मंडळी देखील घरात धुमाकूळ घालताना दिसली. ही इन्फ्लुएन्सरची टीम घरात धमाल-मस्ती करताना दिसली. नुकत्याच झालेल्या महाअंतिम सोहळ्यात टॉप ५ फायनलिस्टमध्ये अंकिता वालावलकर व धनंजय पोवार हे स्पर्धक पाहायला मिळाले. अंकिता वालावलकर व धनंजय पवार या स्पर्धकांचा ट्रॉफीपर्यंतचा प्रवास हुकला आणि त्यांना ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडावे लागले.
घराबाहेर पडल्यानंतर अंकिता व धनंजय पवारच्या खेळाचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. सगळेचजण त्यांना पाठिंबा देत तुम्हीच विजेते आहात असं म्हणत त्यांचं भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत. धनंजय हा मूळचा कोल्हापूरचा असल्याने लगेचच कोल्हापूरला रवाना न होता तो अंकिता वालावलकरच्या मुंबईतील घरी आला असल्याचे दिसले. अंकिताच्या घरीही धनंजय व अंकिताचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
अनेकदा खेळीमेळीने, भांडणांनी चर्चेत राहिलेली ही भावा-बहिणीची जोडी घराबाहेर पडल्यानंतरही एकत्र त्यांचा आनंद साजरा करताना दिसली. केक कट करत दोघांनी हा आनंद साजरा केलेला दिसला. यावेळी अंकिताचे मित्र-मैत्रिणी व धनंजयचे कुटुंबीयही उपस्थित असल्याचे दिसले. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झालेला पाहायला मिळाला.