Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : ‘बिग बॉस मराठी’ सीजन ५ हे पर्व विशेष चर्चेत राहील. यंदाच्या या पर्वातील सर्वच सदस्यांनी धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. शिवाय या सीझनचा होस्ट रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्याने सर्वत्र हवा केली. रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्याची यंदा विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. टीआरपीच्या शर्यतीतही हा शो अव्वल असलेला पाहायला मिळाला. सुरुवातीला रितेश देशमुखला अनेकदा ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. मात्र कालांतराने सर्वांना हा शो होस्ट करताना रितेश देशमुख आवडू लागला. रितेश देशमुखचं ही भरभरुन कौतुक होताना पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर जेनेलियाने स्वतः सुद्धा इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत रितेशचं आणि या शोचं कौतुक केलेलं पाहायला मिळालं.
नुकताच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. यंदाच्या या महाअंतिम सोहळ्याची रंगत खास असल्याचे पाहायला मिळालं. कारण अनेक ट्विस्ट घेऊन येत यंदाचा हा महाअंतिम सोहळा पार पडला आणि महाअंतिम सोहळ्यात विजेत्याचे नाव घोषित झालं. गोलीगत फेम टिक टॉक स्टार सूरज चव्हाणने यंदाच्या ‘बिग बॉस’ची ट्रॉफी पटकावली असल्याचे समोर आलं. सर्वत्र सोशल मीडियावर ही सूरज चव्हाणच्या नावाची चर्चा होताना पाहायला मिळाली. सूरज चव्हाणच यंदाचा विजेता व्हायला हवा असे अनेकांचे म्हणणे असताना अखेर सूरजने ट्रॉफी पटकावली असल्याचे समोर आले.
ट्रॉफी घेतल्यानंतर सूरज चव्हाणचं सर्व क्षेत्रातून कौतुक होताना पाहायला मिळतंय. तर त्याचे चाहते मंडळी ही त्याच्यावर भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत.यानंतर आता रितेश देशमुखची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुखनेही सूरज चव्हाणचं कौतुक केलेलं पाहायला मिळतंय. या ग्रँड फिनालेला जेनेलियाने सुद्धा हजेरी लावली होती. जेनेलियाने रितेशसह सूरजबरोबर ट्रॉफीसह सेल्फी घेतला आणि हा फोटो शेअर करत त्याचं कौतुक केलं असल्याचे दिसलं. जेनेलियाची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळतेय.
जेनेलियाने पोस्ट शेअर करत, “याला म्हणतात स्वप्न सत्यात उतरवणं, नेहमी मोठी स्वप्नं बघा. सूरज चव्हाण ही ट्रॉफी फक्त तुझी आहे. रितेश देशमुख काय सूत्रसंचालन केलंस. तू सर्वात बेस्ट आहेस. कलर्स मराठी टीम मी पुढच्या सीझनची वाट पाहू शकत नाही”, असं म्हणत सूरजच तोंडभरुन कौतुक केलं.