Bigg Boss Hindi 18 Grand Premiere Updates : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो आज अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या म्हणजेच बिग बॉस’चे सूत्रसंचालन सलमान खान करत आहे. आता या शोमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिग बॉसच्या नवीन सीझनचा सूत्रसंचालक सलमान खानची ग्रँड एण्ट्री झाली आहे. त्यानंतर आता घरात अनेक स्पर्धकही सहभागी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज पार पडणाऱ्या ग्रँड प्रीमियर सोहळ्यात याचा उलगडा झाला आहे.
आतापर्यंत या घरात आठ सदस्यांची एंट्री झाली आहे. अभिनेता करणवीर मेहरानेदेखील धमाकेदार एंट्री घेतली आहे. आजवर करण अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका संकरल्या आहेत. करण त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत राहिला आहे. आता ‘बिग बॉस’मध्ये त्याच्या आयुष्यातील अनेक पदर उलगडले जाणार आहेत. करणनंतर एका लक्षवेधी चेहऱ्याने एंट्री केली आहे. हा लक्षवेधी चेहरा म्हणजे रजत दलाल. रजतने आजवर पॉवर लिफ्टिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच सोशल मीडियावरील देखील प्रसिद्ध चेहरा आहे. त्याचप्रमाणे तो फिटनेस ट्रेनरदेखील आहे. प्रीमियरमध्ये त्याने आतापर्यंत कोणत्या कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले याबद्दलही सांगितले आहे.
सगळ्या स्पर्धकांच्याधमाकेदार एंट्रीनंतर ११ वा सदस्य घरात आला आहे. मुस्कान बामणेने घरात एंट्री घेतली असून ती टेलिव्हीजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर ती अनेक मालिकांमध्ये दिसून आली आहे. नुकतीच ती प्रसिद्ध मालिका ‘अनुपमा’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसून आली होती. त्यानंतर या घरात एक जोडीदेखील आली आहे. आरफीन खान व सारा अरफीन खान यांची एंट्री पाहायला मिळाली. या शोमध्ये ते लोकांची मनं वाचण्यासाठी आल्याचं त्यांनी सांगितले.
दरम्यान, नुकतीच ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली असून हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांना कलर्स वाहिनीसह जिओ सिनेमावरही पाहता येणार आहे. रोज रात्री ९ वाजता ‘बिग बॉस’ हा शो बघता येणार आहे. २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस’च्या घरात यावर्षी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.