Bigg Boss Hindi 18 Grand Premiere Updates : ‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वाला मोठ्या जोशात सुरुवात झाली आहे. या पर्वाचं सूत्रसंचालन सुपरस्टार सलमान खान करत आहे. आतापर्यंत घरांमध्ये टेलिव्हीजन तसेच सोशल मीडियावरील प्रसिद्ध कलाकारांनी एंट्री घेतली आहे. सगळ्यांचीच एंट्री धमाकेदार असलेली पाहायला मिळाली. सगळ्यांच्याच धमयकेदार एंट्री पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती आणि अखेर या घरात स्पर्धकांची एंट्री झाली आहे. आज या कार्यक्रमाची ग्रँड सुरुवातदेखील पाहायला मिळत आहे. यामध्ये कोणकोणते सदस्य सहभागी झाले आहेत याची उत्सुकता चाहत्यांना लागली असून आता एक-एक सदस्य समोर येताना दिसत आहे.
आतापर्यंत ‘बिग बॉस’च्या घरात करणवीर मेहरा, रजत दलाल, मुस्कान बामणे यांचा सहभाग पाहायला मिळाला. आता या घरामध्ये १४ व्या सदस्याने हजेरी लावली. ही सदस्य म्हणजे अभिनेत्री इशा सिंह. ईशाने आजवर अनेक हिंदी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर यामध्ये १५ व्या सदस्याची एंट्री झाली. हा चेहरा संपूर्ण महाराष्ट्राच्या ओळखीचा आहे. ते म्हणजे डॉ.वकील गुणरत्न सदावर्ते. सदावर्ते महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्दयामुळे अधिक चर्चेत आले होते. त्यामुळे यामध्ये आता ते काय करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सदावर्ते यांच्यानंतर १६व्या स्पर्धकाची एंट्री झाली आहे. हेमा शर्मा ही सोशल मीडियावरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. या शोमध्ये काय धमाल करणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हेमा ही ‘व्हायरल भाभी’ या नावानेदेखील अधिक प्रसिद्ध आहे. हेमानंतर १७ व्या स्पर्धकाची एंट्री झाली असून हा अभिनेता विवियन दसेनाने धमाकेदार एंट्री केली आहे. आजवर विवियन अनेक हिंदी मालिकांमध्ये दिसून आला आहे. ‘मधुबाला’ , ‘सिर्फ तुम’, ‘प्यार की एक कहाणी’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकरल्या आहेत.
विवियननंतर शेवटच्या म्हणजे १८ व्या सदस्याची एंट्री झाली आहे. अभिनेत्री ॲलिस कौशिकची एंट्री झालेली पाहायला मिळत आहे. ॲलिस आजवर अनेक मालिकांमध्ये दिसून आली आहे. मंचावर येताच तिच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. तसेच ती खूप भावुक झालेलीदेखील पहायला मिळाली. पण आता ‘बिग बॉस’मध्ये ती कसा खेळ खेळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सगळ्या सदस्यांची घरात एंट्री झाली असून आता काय होणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.