Bigg Boss Hindi 18 Grand Premiere Updates : बिग बॉस मराठी संपल्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा बिग बॉस हिंदीकडे लागल्या आहेत. या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यामध्ये कोण-कोण सदस्य सहभागी होणार आहेत यांची नावं समोर आली आहेत. कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासूनच अनेक कलाकारांची नावं समोर येत होती. यामध्ये बॉलिवूड, टेलिव्हिजन, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचा समावेश असलेला दिसून आला. मात्र समोर आलेल्या सगळ्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाला नाही. अभिनेत्री निया शर्माचे नाव सुरुवातीपासून घेतले गेले. मात्र तिने स्वतः सहभागी होणार नसल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तसेच वाहिनीने सहभागी कलाकारांची ओळख प्रोमोच्या माध्यमातून करुन दिली. अशातच आता नक्की कोण स्पर्धक आहेत हे जाणून घेऊया.
चार सदस्यांची एंट्री झाल्यानंतर आता पाचव्या सदस्याची एंट्री झाली आहे. भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांची एंट्री झाली आहे. त्यांनी यामध्ये तुरुंगात घालवलेल्या दिवसांबद्दलही सांगितले आहे. आतापर्यंत ते चार ते पाच वेळा तिहार तुरुंगात गेले असल्याचेही सांगितले. त्यामुळे आता ‘बिग बॉस’मध्ये १०० दिवस कसे असणार याबद्दल ते उत्सुकता दाखवत आहेत. यानंतर सहाव्या सदस्याचीदेखील एंट्री झाली असून ही दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. श्रुतिका अर्जुनने धमाकेदार एंट्री केली आहे. तिच्या विनोदी अंदाजाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Hindi 18 Grand Premiere : चाहत पांडे, अविनाश मिश्रा, शहजादा धामी, शिल्पा शिरोडकर यांची ‘बिग बॉस १८’च्या घरात एंट्री, कोण ठरणार वरचढ?
श्रुतिकानंतर सातव्या सदस्याची एंट्री झालेली पाहायला मिळाली. अभिनेत्री नायरा बॅनर्जीची एंट्री झाली आहे. मंचावर येताच सगळ्यांवर तिने डान्स व अभिनयाने जादू केली आहे. नायरानंतर लगेचच चुम तरंगची एंट्री झाली असून तिने अनेक चित्रपट व वेबसिरिजमध्ये काम केले आहे. तसेच तिने अनेक सौंदर्यस्पर्धादेखील जिंकल्या आहेत. मूळची ही अरुणाचल प्रदेश येथील आहे.
या ग्रँड प्रीमियरमध्ये सगळ्याच स्पर्धकांची ग्रँड एंट्रीदेखील पाहायला मिळाली. आतापर्यंत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र मंचावर आपली जादू दाखवणारे स्पर्धक घरात काय गोंधळ घालणात? याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. तसेच ‘बिग बॉस’चे टास्क सगळेच पूर्ण करणार का? आणि शेवटपर्यंत कोण लढणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.