शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेकीच्या जन्मानंतर प्रिन्स नरुला व युविका चौधरी यांच्या नात्यात दुरावा, एकमेकांपासून विभक्त होणार?, काय बिनसलं?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 26, 2024 | 11:01 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss fame Prince and Yuvika marriage in trouble Rumors viral on social media

प्रिन्स नरुला व युविका चौधरी यांच्या नात्यात दुरावा, सहा वर्षांनी नेमकं काय बिनसलं?

टेलिव्हिजन विश्वातील सर्वात आवडते जोडपे प्रिन्स नरुला व त्याची पत्नी युविका चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली होती. लग्नाच्या ६ वर्षानंतर प्रिन्स व युविका यांनी आई-बाबा होणार असल्याची खुशखबर सांगितली. युविकाने (१९ ओक्टोबर, शनिवार) रोजी मुलीला जन्म दिला. लग्नानंतर सहा वर्षांनी चिमुकलीच्या आगमनामुळे त्यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. अशातच आता या जोडप्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही ठीक नसल्याचं बोललं जात आहे. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. (Prince Narula and Yuvika Chaudhary Marriage Rumours)

प्रिन्स आणि युविकाच्या वैवाहिक जीवनात सर्व काही ठीक नसल्याचं बोललं जात आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओही व्हायरल होत असून त्यावर त्यांच्या चाहत्यांनी वेगवेगळे निष्कर्ष बांधले आहेत. झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला यांच्या संसारात काही अडचणी आल्या आहेत. युविकाने २४ नोव्हेंबरला प्रिन्सच्या वाढदिवसानिमित्त एकही पोस्ट शेअर केली नाही. तर प्रिन्सनेसुद्धा फक्त आपल्या मुलीबरोबरचे फोटो शेअर केले. यानंतरच त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

View this post on Instagram

A post shared by PRINCE YUVIKA NARULA ❤️❤️❤️ (@princenarula)

आणखी वाचा – “तुम्ही बेअक्कल लोक…”, मुंबईतील बेशिस्त वाहनचालकांवर संतापली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, “हा मुर्खपणा…”

याआधी प्रिन्सने त्याच्या व्लॉगमध्ये युविकाच्या डिलिव्हरीची माहिती नसल्याचे सांगितले होते. मात्र, या अफवांवर त्याच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. युविकाने नुकतीच सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली होती. त्यात तिने भगवान शिव शंकर आणि पार्वतीचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मला तुमच्याकडून हेच हवे आहे. विश्वास, आदर, काळजी आणि प्रामाणिकपणा”. तर तिच्या दुसऱ्या पोस्टमध्ये तिने गर्व, पैसा, सत्ता आणि अहंकार यांचा उल्लेख केला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss OTT 2 फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, “माफ करा…”

दरम्यान, ‘बिग बॉस ९’पासून युविका व प्रिन्स यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. प्रिन्स युविकापेक्षा सात वर्षांनी लहान आहे. युविका ४० वर्षांची असून प्रिन्स ३३ वर्षांचा आहे. ‘बिग बॉस’मध्ये प्रेमात पडल्यानंतर काही वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले आणि मग २०१८ साली दोघांनी लग्न केलं. अशातच लग्नाच्या सहा वर्षांनी या दोघांनी मुलीला जन्म दिला आहे. पण आता त्यांच्यामध्ये काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे.

Tags: Prince NarulaPrince Narula and Yuvika Chaudhary MarriageYuvika Chaudhary
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Dhananjay Powar And Ankita Walavalkar Video

Video : डीपीने अंकिता वालावलकरची उडवली खिल्ली, कार्यक्रमात मिळालेलं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं अन्…; सगळ्यांनाच हसू अनावर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.