बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आधी ब्रेकअप आता बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर शिव ठाकरेचं अफेअर?, लग्नाबाबत प्रश्न विचारताच म्हणतो, “आताच माझं…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 23, 2023 | 1:56 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
shiv thakare talks about his marriage

आधी ब्रेकअप आता बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर शिव ठाकरेचं अफेअर?, लग्नाबाबत प्रश्न विचारताच शिव ठाकरे म्हणतो, "आताच माझं..."

हिंदी मनोरंजन सृष्टीमध्ये सध्या एका चेहऱ्याची जोरदार चर्चा होत आहे, ती म्हणजे मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे. मॉडेल व अभिनेता असलेल्या शिवने ‘बिग बॉस मराठी’ या शोचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर तो ‘हिंदी बिग बॉस’ मध्येही सहभागी झाला होता. मात्र, तिथे त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. शिव ठाकरे सध्या ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये पाहायला मिळतं असून त्याच्याकडे अनेक रिऍलिटी शो व चित्रपटांची रांग लागली आहे. त्यामुळे शिवची लोकप्रियता मराठीसह हिंदी भाषिक प्रदेशात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. (Shiv Thakare Marriage)

एकीकडे करिअरमुळे चर्चेत येणारा शिव त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आला आहे. शिव ठाकरेचे याआधी अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले होते. आता पुन्हा एका नव्या अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जोडले जात असल्यामुळे शिव ठाकरे लग्नबंधनात अडकणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

हे देखील वाचा – “गुडघा दुखतोय का?”, प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स, अभिनेत्री म्हणते, “पोजेस देणं…”

अशातच शिवने त्याच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. शिव ठाकरेने नुकतीच एक मुलाखत दिली होती. ज्यात त्याला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ‘लग्न कधी करणार?’ असा प्रश्न विचारताच शिव ठाकरे उत्तर देताना म्हणाला, “आताच माझं करिअर सुरू झालं आहे. जे हसू माझ्या चेहऱ्यावर आहे, ते तसेच राहू द्या. ते नैसर्गिक हसू आहे.”, असं म्हणत त्याने लग्नाचा मुद्दा टाळला आहे.

हे देखील वाचा – “…आणि ते मला भिकारी समजले”, ‘ताली’मध्ये काम केलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “भीक मागण्यासाठी…”

‘बिग बॉस मराठी’च्या घरात असताना अभिनेत्री वीणा जगताप आणि शिव ठाकरे यांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली होती. घराबाहेर पडल्यानंतरही दोघांचे प्रेम चांगलंच फुललं होतं. मात्र, काही काळानंतर दोघांचे नाते बिनसले आणि पुढे त्यांचा ब्रेकअप झाला. शिव ठाकरेचे नाव आता बॉलिवूड अभिनेत्री डेजी शाहबरोबर जोडलं जात असून हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे. (Shiv Thakare Marriage)

Tags: bigg boss marathishiv thakareShiv Thakare Marriage
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Rutuja Bagwe new house Nameplate

Video : फुलांचं सुंदर नक्षीकाम, खास डिझाईन आणि…; ऋतुजा बागवेच्या नव्या घराच्या नेमप्लेटची चर्चा, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.