नाटक, मालिका व चित्रपट या तीनही माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. ऋतुजाने आजवर अनेक भूमिका साकारल्या आहे. तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. अभिनयाबरोबरच ऋतुजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती तिचे फोटोशूटस व व्हिडिओज आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेहमी शेअर करते. याशिवाय ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बऱ्याचदा चर्चेत असते. (Rutuja Bagwe new house Nameplate)
अभिनेत्री ऋतुजा बागवे सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घडामोडी चाहत्यांसमोर शेअर करते. ऋतुजाने काही दिवसांपूर्वी मुंबईत स्वतःचे नवीन घर घेतले होते. त्या घरासाठी तिने एक खास नेमप्लेट बनवून घेतली आहे. तिने त्या नेमप्लेटची एक छोटीशी झलक आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली असून तिची ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हे देखील वाचा – आधी ब्रेकअप आता बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर शिव ठाकरेचं अफेअर?, लग्नाबाबत प्रश्न विचारताच म्हणतो, “आताच माझं…”
ऋतुजा बागवेने मुंबईत तिचं स्वतःचं पहिलं घर घेतलं असल्याची बातमी चाहत्यांची शेअर केली होती. त्यानंतर तिच्या या नवीन घराबद्दलचे अपडेट्स ती सोशल मीडियावर सतत देत असते. या घराच्या इंटिरियरचे काम सध्या सुरू असून या नवीन घरासाठी तिने एक खास नेमप्लेट तयार करून घेतली आहे. ऋतुजाच्या या नव्या घराची नेमप्लेट अतिशय सुंदर व आकर्षक आहे. पांढऱ्या रंगाच्या फुलांची सुंदर नक्षी असलेल्या या नेमप्लेटवर ऋतुजाने तिच्या आई-वडिलांचे नाव लावले आहे. (Rutuja Bagwe new house Nameplate)
हे देखील वाचा – “गुडघा दुखतोय का?”, प्राजक्ता माळीच्या नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स, अभिनेत्री म्हणते, “पोजेस देणं…”
या नेमप्लेटची छोटीशी झलक तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. ‘ऋतुजा प्रतिभा राजन बागवे’ असं पूर्ण नाव लिहिलेली ही आकर्षक नेमप्लेट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर नेटकरीही तिच्या पोस्टवर कमेंट्सद्वारे व्यक्त होत आहे.