सोमवार, जून 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

फायद्यासाठी सुशांत सिंह राजपूतचं नाव सातत्याने घेत होती अंकिता लोखंडे?, भडकून दिलं उत्तर, म्हणाली, “त्याच्याबद्दल काही बोलले तर…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 23, 2024 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bigg boss Ankita lokhande reveals why she keep talking about sushant singh Rajput see the details

फायद्यासाठी सुशांत सिंह राजपूतचं नाव सातत्याने घेत होती अंकिता लोखंडे?, भडकून दिलं उत्तर, म्हणाली, "त्याच्याबद्दल काही बोलले तर..."

‘बिग बॉस’च्या यंदाच्या १७ व्या पर्वाचा प्रवास आता अंतिम सोहळ्याच्या दिशेने सुरु झाल आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे पर्व अनेक कारणांनी गाजले. त्यापैकी एक कारण म्हणजे अंकिता लोखंडे व तिच्याकडून दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे सतत घेतले जाणारे नाव. या शोदरम्यान, अभिनेत्री अनेक वेळा सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख करताना दिसली. यामुळे तिला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे. अंकिता हे सगळं सहानुभूती मिळविण्यासाठी करत असल्याचे अनेकांनी म्हटले होते.

अशातच नुकत्याच झालेल्या भागातदेखील तिला याबद्दल विचारण्यात आले. ‘बिग बॉस’च्या नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत घरातील सदस्यांना मीडियाच्या अनेक तीक्ष्ण प्रश्नांना सामोरे जावे लागले. यादरम्यान अकिंता लोखंडेला तिचा एक्स-बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल प्रश्न विचारण्यात आला. एका पत्रकाराने तिला “सुशांतचे नाव घेणे हा तुझ्या खेळाचाच एक भाग होता का?, जेणेकरून तुला त्याच्या चाहत्यांकडून सहानुभूती मिळेल?” असा प्रश्न विचारला.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – ‘या’ दिवशी पार पडणार ‘ऑस्कर २०२४’ पुरस्कार सोहळा, वाचा कधी व कुठे पाहता येणार?, कोणत्या चित्रपटांना नामांकन मिळणार?

यावर उत्तर देत अंकिता असं म्हणाली की, “अजिबात नाही. हे चुकीचे आहे. मी व अभिषेक नेहमी त्याच्याबद्दल बोलतो. आम्ही त्याला आदर्श म्हणून पाहतो. अभिषेकला सुशांतसारखं व्हायचं आहे. मी त्याच्याबद्दल नेहमीच चांगल्या गोष्टी बोलले आहे. ‘बिग बॉस’च्या या प्लॅटफॉर्मवरुन मी त्याच्याबद्दल काही चांगले बोलले असेल तर त्यात काय हरकत आहे? त्याने अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेत. मी  त्याचा प्रवास जवळून पाहिला आहे. त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलले.”

आणखी वाचा – अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठासोहळ्याच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केला अभिमानास्पद क्षण

दरम्यान, या घरातून विकी जैनचा प्रवास संपला असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता घरात फक्त अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी व मुन्नवर फारुकी हे अंतिम लढतीसाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. येत्या २८ जानेवारी रोजी ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे अनेक चाहते याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Tags: ankita lokhandebigg bossbigg boss 17bigg boss newsBollywood entertainment newsentertainment newssushant singh rajputअंकिता लोखंडेबिग बॉसबिग बॉस १७बिग बॉस बातमीबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमीसुशांत सिंह राजपूत
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Savitribai Jotirao Phule
Entertainment

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास, ‘मराठी वारसा’ युट्युब चॅनेलवर पहिला भाग प्रसारित

जून 22, 2026 | 4:13 pm
Ghabadkund Marathi Movie
Entertainment

‘घबाडकुंड’ च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय, ५० कोटींची भव्य गुंतवणूक

जून 22, 2026 | 4:07 pm
Nikhil Chavan Wedding
Entertainment

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

जून 22, 2026 | 3:09 pm
Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली ‘साकव’ वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

जून 22, 2026 | 1:35 pm
Next Post
Ankita Jain Bhabhi Reshu Jain

अंकिता लोखंडेवर तिची जाऊबाईच पडली भारी, 'बिग बॉस १७'मध्ये आल्यानंतर अभिनेत्रीशी होतेय तुलना कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.