Bigg Boss 18 : सलमान खान होस्ट करत केलेला लोकप्रिय रिअॅलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस १८’ आज (रविवार) रात्री ९ वाजता सुरू होणार आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या अनेक स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. मात्र काहींच्या नावावर शिक्कामोर्तब होणे अजून बाकी आहे. त्यात प्रसिद्धी टीव्ही अभिनेत्री निया शर्माही या शोमध्ये भाग घेणार असल्याच्या अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. पण आता अखेर निया शर्मा ‘बिग बॉस’च्या १८व्या सीझनचा भाग होणार नसल्याचे समोर आले आहे. ती या शोमध्ये सहभागी होणार नसल्याची बातमी आधीच व्हायरल झाली होती, पण आता नियाने स्वतः एक पोस्ट शेअर करत याबद्दल खुलासा केला आहे आणि चाहत्यांची माफीही मागितली आहे. (Bigg Boss 18 Nia Sharma)
निया शर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, “तुमच्या प्रचंड पाठिंब्यामुळे मी भारावून गेले आहे. तुमच्या या प्रेमामुळे आणि वेडेपणामुळे मला ‘बिग बॉस’च्या घरामध्ये जावेसे वाटले. तसंच गेल्या १४ वर्षात मी काय कमावले याची जाणीवदेखील मला झाली. मी असे म्हणू शकत नाही की, तुम्ही माझ्या नावाचा केलेला प्रचार आणि तुम्ही माझ्या नावाचा केलेला वापर मी एन्जॉय केला नाही. परंतु कृपया मला दोष देऊ नका आणि मित्रांनो क्षमस्व… ती मी नव्हते”.

याआधीही निया शर्माला ‘बिग बॉस’चा भाग बनण्याची ऑफर अनेकदा आली होती, मात्र तिने नेहमीच ही ऑफर नाकारली. मात्र, तिने यंदा ही संधी स्वीकारून चाहत्यांना आश्चर्यचकित केले असल्याचे म्हटलं गेलं. गेल्या आठवड्यात, ‘खतरों के खिलाडी १४’ च्या फिनालेदरम्यान रोहित शेट्टीने तिला पहिली पुष्टी केलेली स्पर्धक म्हणून घोषित केले आणि चाहत्यांना गोंधळात टाकले. पण आता नियाच्या नावाबाबत एक जबरदस्त ट्विस्ट समोर आला आहे. तो म्हणजे ती या शोमध्ये सहभागी होणार नाही.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्यावर पैशांचा गैरव्यवहार केल्याबद्दल तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, यंदाच्या ‘बिग बॉस १८’मध्ये हेमलता शर्मा, नायरा बॅनर्जी, मुस्कान बामने, तनजिंदर पाल सिंग बग्गा, रजत दलाल, चुम दरंग, अतुल किशन, करणवीर मेहरा, शेहजादा धामी, विवियन जिसेना, ईशा सिंग, श्रुतिका राज अर्जुन, चगत पांडे हे कलाकार सहभागी होणार असल्याचे म्हटलं जात आहे. मात्र याबद्दल नेमका खुलासा आजच होईल.