मराठी चित्रपटसृष्टीमधील रिअल लाइफ कपलपैकी सतत चर्चेत असणारं एक जोडपं म्हणजे श्वेता मेहेंदळे व राहुल मेहेंदळे. श्वेता व राहुल सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत एकत्र काम करत आहेत. मालिकेत साकारत असलेल्या दोघांच्या भूमिकांना प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळत आहे. श्वेता मालिकेत साकारत इंद्राणी हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे तर राहुलच्या शेखर या पात्रावरही प्रेक्षक प्रेम करत आहेत. प्रेक्षकांचं सातत्याने मनोरंजन करणारे हे जोडपे मनोरंजन क्षेत्रासह सोशल मीडियावर तितकेच सक्रीय असतात. (Shweta and Rahul Mehendale New Car)
अभिनेत्री श्वेता मेहेंदळे व राहुल मेहंदळे ही जोडी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. सोशल मीडियावर ही जोडी आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. श्वेता ही अभिनेत्री असण्याबरोबरचं एक व्लॉगरही आहे. तिला फिरण्याची फार आवड आहे. विशेष म्हणजे श्वेता ही अनेकदा बाईक राईडही करते आणि या राईडचे अनेक व्हिडीओ ती आपल्या सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. अभिनेत्रीही आयुष्यात याआधी दुचाकी होती मात्र आता तिने एक चारचाकीदेखील घेतली आहे आणि यांची खास झलकही तिने शेअर केली आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्यावर पैशांचा गैरव्यवहार केल्याबद्दल तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?
श्वेता व राहुल मेहंदळे यांनी नुकतीच एक महागडी कार खरेदी केली असून यांचा खास व्हिडीओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. अभिनेत्रीने वाढदिवसानिमित्त आलिशान कार खरेदी केली असून याचा सुंदर व्हिडीओ तिने शेअर केला आहे. तसंच हा व्हिडीओ शेअर करत तिने आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. हे माझे वाढदिवसाचे गिफ्ट आहे. कृपया ‘शूमी’चे स्वागत करा. तुम्ही दिलेल्या प्रेम व पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार”. या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने शोरुममध्ये गाडीची पूजा केल्याचे व घरी येऊन आईच्या हातून गाडीचे स्वागत केल्याची खास झलक पाहायला मिळत आहे.
श्वेता व राहुल यांनी घेतलेल्या या नवीन गाडीनिमित्त अनेक कलाकारांनी व त्यांच्या चाहत्यांनी त्यांना कमेंट्स करत अभिनंदन असं म्हटलं आहे. त्याचंबरोर शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका अजूनही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. याच मालिकेतील तिच्या ‘रेवती’ या भूमिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली होती. आणि सध्या टी सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे