सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे अभिनेता नागार्जुन एका मोठ्या अडचणीत सापडला आहे. एका व्यक्तीने हैद्राबादच्या एन कन्व्हेन्शन सेंटरशी संबंधित प्रकरणात पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करत अभिनेत्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी संध्याकाळी (३ ऑक्टोबर २०२४) भास्कर रेड्डी नावाच्या व्यक्तीने नागार्जुनविरुद्ध माधापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बेकायदेशीर जमीन अतिक्रमणाबाबत ही तक्रार दाखल करण्यात आली असून कोसम मनसाक्षी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष कासिरेड्डी भास्कर रेड्डी यांनी तक्रार दाखल केली होती, असे ‘इंडिया टुडे’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे. (Nagarjuna Money Misappropriation Complaint Filed)
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, माधापूर सर्कल इन्स्पेक्टर कृष्ण मोहन यांनी सांगितले की, नागार्जुनविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीत अभिनेत्याने घटनास्थळावरून चुकीचा नफा कमावल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ही रक्कम वसूल करून सरकारला परत करण्याची मागणी तक्रारदार भास्कर रेड्डी यांनी केली आहे. तसंच पोलिस इन्स्पेक्टर मोहन पुढे म्हणाले की, ‘कायदेशीर अभिप्राय घेऊन आम्ही या प्रकरणाची चौकशी करु. मात्र अद्याप अभिनेत्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही”.
अभिनेता नागार्जुन यांनी बेकायदा बांधलेले एन कन्व्हेन्शन सेंटर २४ ऑगस्ट २०२४ रोजी पाडण्यात आले. कुंता तलावाच्या जमिनीवरील हे बांधकाम बेकायदा असल्याचा राज्य सरकारचा आरोप आहे. हैदराबाद आपत्ती निवारण आणि मालमत्ता संरक्षण यंत्रणेच्या ही धडक कारवाई केली होती. कुंता तलावालगतच्या एन. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ३ हॉल होते. अनेक भव्य कार्यक्रम इथे होत असत. राजकीय पक्षांचे मेळावे, संघटनांची अधिवेशने, दिमाखदार विवाहसोहळे आदींनी हे सेंटर गजबजलेले असे.
A complaint has been filed by a person named Bhaskar Reddy yesterday evening against Actor Nagarjuna. The complainant states that Nagarjuna has gained money from the N Convention. The complainant stated that this money should be recovered and given to the government. We will…
— ANI (@ANI) October 5, 2024
आणखी वाचा – नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रवि योगाचा शुभ संयोग, कर्क व कुंभ राशीच्या लोकांना मिळणार नाशिबाची साथ
एन कन्व्हेन्शन सेंटर दहा एकरमध्ये पसरले आहे. येथील बांधकाम जमीन बेकायदा वापर आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्याचे तेलंगणा सरकारने स्पष्ट केले होते. कुंता तलावाची मुक्तता करणे हा एकमेव उद्देश आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना कारवाई करताना आम्ही मागे हटणार नाही, नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सरकारच्या ठाम आहे. असा निर्धारही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केला होता.
Dear all,
— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) August 25, 2024
fans and well-wishers,
News about celebrities, can often be exaggerated and speculated for effect.
I would like to reiterate that the land on which N-convention has been built is a Patta Documented land. Not even one cent of the land beyond that has been encroached…
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्याने एक्स पोस्ट करत असं म्हटलं होतं की, “मी सांगू इच्छितो की, एन. कन्व्हेन्शन ज्या जमिनीवर बांधले गेले आहे ती लीज डीड जमीन आहे. मी एक टक्काही जमिनीवर अतिक्रमण केलेलं नाही. माझ्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी काही तथ्य रेकॉर्डवर ठेवण्यासाठी हे विधान जारी करणे मला योग्य वाटले. कायद्याचे पालन करणारा नागरिक या नात्याने न्यायालयाने माझ्या विरोधात निर्णय दिला असता, तर ते सेंटर मी स्वत: पाडले असते”.