छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर. या मालिकेत तिने अंजली पाठक ही भूमिका साकारत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची जोडी मराठी मनोरंजन विश्वात प्रचंड लोकप्रिय झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर हे पडद्यावरचे सहकलाकार खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकले. अक्षया-हार्दिक ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांच्या या फोटो व व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. (Akshaya Devdhar Romantic Post)
अशातच आज हार्दिकच्या वाढदिवसानिमित्त त्याची लाडकी बायको म्हणजेच अक्षया देवधरने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. अक्षयाने हार्दिकबरोबरचे क्युट फोटो शेअर करत त्याला वाढदिवसानिमित्त हटके शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयांनी हार्दिकला शुभेच्छा देत असं म्हटलं आहे की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा… माझ्या हास्याचे कारण बनल्याबद्दल धन्यवाद. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. देव तुम्हाला सदैव आशीर्वाद देवो”.
आणखी वाचा – Bigg Boss 18 मध्ये निया शर्मा नसणार? पोस्टद्वारे स्वत: केला खुलासा, म्हणाली, “मला दोष देऊ नका कारण…”
अक्षयाने हार्दिकबरोबरचे रोमॅंटिक फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून या फोटोला चाहत्यांनीदेखील लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अक्षयाच्या या पोस्टला हार्दिकनेही कमेंट्स करत उत्तर दिलं आहे. हार्दिकने “माझंही तुझ्यावर प्रेम आहे” अशी हटके कमेंट केली आहे. तसंच या पोस्टखाली श्रेया बुगडे, अभिज्ञा भावे आणि अमोल नाईक यांसह अनेक कलाकारांनी हार्दिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने महाराष्ट्राला वेड लावलं होतं. या मालिकेतील राणादा आणि अंजलीबाई या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. २०२२ ला अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी लग्नगाठ बांधली. या दोघांची ऑफस्क्रिन केमेस्ट्रीदेखील भन्नाट आहे. दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर हार्दिक अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो तर अक्षयाने नुकताच तिच्या साड्यांच्या नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे.