टेलिव्हिजन अभिनेता विवियन डिसेना सध्या ‘बिग बॉस १८’मुळे खूप चर्चेत आहे. आजवर त्याने अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते. ‘मधुबाला’, ‘शक्ति’, ‘सिर्फ तुम’ व इतर अनेक मालिकांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘प्यार की एक कहाणी’ या मालकेमध्ये काम करत असताना त्याची ओळख अभिनेत्री वाहबीज दोराबजीबरोबर झाली. सेटवरच त्यांच्यामध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. लग्नाच्या सात वर्षानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. नंतर तो नुरान अली बरोबर लग्नबंधनात अडकला. (vivian dsena on divorce)
‘बिग बॉस’चा सध्या दुसरा आठवडा सुरु आहे. अनेक सदस्यांच्या खासगी आयुष्याबद्दल खूप चर्चादेखील ऐकायला मिळते. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये विवियन व शिल्पा शिरोडकर बोलत असतात. यावेळी शिल्पा यांनी पत्नी नुरानबद्दल चर्चा केली. नुरानबरोबर पहिली भेट कशी झाली? असं विचारलं. यावेळी त्याने सांगितले की, “नुरान पत्रकार आहे. त्यावेळी तिला एका मुलाखतीसाठी मी चार महीने वाट बघायला लावली होती. त्याचा बदला ती आजपर्यंत घेत आहे”.
यानंतर शिल्पाने त्याच्या घटस्फोटाबद्दल आणि पहिल्या पत्नीबद्दलदेखील विचारले. तेव्हा तो म्हणाला की, “मी नुरानला भेटलो तेव्हा मी घटस्फोटीत होतो”. शिल्पा यांनी नंतर विचारले की, “कीती काळ तुम्ही विवाहित होतात?” त्यावर विवियनने सांगितले की, “मला नाही माहीत. जोपर्यंत तिने मला सहन केलं आणि मी नक्की कोण आहे हे तिला जेव्हा समजलं तेव्हापर्यंतच ती माझ्याबरोबर होती”.
पुढे त्याने सांगितले की, “जोपर्यंत काही चुकीचं घडत नाही तोपर्यंत काही चांगलंदेखील घडत नाही. तसेच माझ्यामध्ये झालेला बदल हा एका रात्रीत झालं नाही. पण नुरान चांगली आहे. ती माझ्या आयुष्यात आहे त्यामुळे खूप सुखी आहे”. दरम्यान विवियन वाहबीजबरोबर २०१३ साली लग्नबंधनात अडकला होता. मात्र २०२१ साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०२२ साली तो पत्रकार नुरानबरोबर लग्नबंधनात अडकला.