‘कलर्स वाहिनी’वरील ‘बिग बॉस’चे १८ वे पर्व खूप चर्चेत आले. अभिनेता करणवीर मेहरा हा या पर्वाचा विजेता ठरला. करणवीरच्या विजयानंतर अनेकांनी नाराजीदेखील दर्शवली. विवियन डिसेना हा या पर्वाचा उपविजेता ठरला. ‘बिग बॉस’ संपल्यानंतर प्रत्येक कलाकार कुटुंबासमवेत वेळ घालवताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी विवियन व त्याच्या पत्नीने पार्टीचे आयोजन केले होते. मात्र या पार्टीमध्ये करणवीर व चुम दरांग यांची अनुपस्थिती बघायला मिळाल्याने चाहत्यांच्या मनात खूप प्रश्नदेखील उपस्थित राहिले होते. विवियनला याबद्दल विचारल्यानंतर त्याने या प्रश्नाचे उत्तर देणं टाळलं. मात्र आता विवियन त्याच्या कुटुंबाबरोबर त्याचा वेळ घालवत आहे. (vivian dsena with family)
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या विवियनने काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो त्याची पत्नी व मुलींबरोबर डिनर डेटला गेला असल्याचे दिसून आले. समोर आलेल्या फोटोंमध्ये विवियन मुलींबरोबर व पत्नीबरोबर धमाल मस्ती करताना दिसत आहे. डिनर टेबलवर जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर तो त्याच्या घरी म्हणजे मिस्रला गेला आहे.
हे फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अखेर घरी. मी माझ्या प्रियजनांसह क्वालिटी टाइम एंजॉय करताना दिसत आहेत. यामुळे मला खूप आनंद झाला आहे”. याआधीदेखील विवियनच्या पत्नीने त्याच्यासाठी सरप्राइज पार्टी ठेवली होती. मात्र या पार्टीमध्ये करणवीर मेहरा नसल्याने चर्चांना उधाण आले होते. विवियनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
विवियनने न बोलवण्याच्या चर्चांवर करणवीर म्हणाला की, “मी जाणूनबुजून काहीही केलं नाही. ट्रॉफी खूप जड होती. त्यामुळे मी त्याच्या हातात माइक दिला. मी काहीही ठरवून केलं नाही”. दरम्यान करणवीरच्या या कृतीने विवियनचे चाहते खूप नाराज झालेले बघायला मिळाले. तसेच विवियनला कमीपणा यावा यासाठी करणने असं केलं असंही नेटकऱ्यांनी म्हंटलं आहे. मात्र असं काहीही नसल्याचे करणने स्पष्ट केले.