सध्या देशभरात प्रयागराज येथील महाकुंभची चर्चा सुरु आहे. या महाकुंभमध्ये जगभरातील अनेक भाविक समाविष्ट झाले आहेत. आजवर करोडो भाविकांनी या मेळ्यामध्ये हजेरी लावली आहे. त्याचप्रमाणे अनेक दिग्गज कलाकार तसेच अनेक दिग्गज व्यक्तीदेखील महाकुंभ येथे हजर राहिल्या होत्या. दरम्यान महाकुंभमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याने एकच गोंधळ उडाला आणि त्यामुळे चेंगराचेंगरीदेखील झाली. यामध्ये अनेक भाविक जखमी झाल्याची शक्यता वर्तवत आहेत. मात्र याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. आशातच अभिनेत्री हेमा मालीनी मौनी अमावस्येच्या निमित्ताने महाकुंभ येथे पोहोचल्या आहेत. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. (hema malini at prayagraj)
महाकुंभमध्ये मौनी अमावस्येच्या निमित्ताने खूप गर्दी उसळली होती. यावेळी चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिति निर्माण झाली. यामध्ये अनेक भाविक जखमी झाल्याचे वृत्तदेखील समोर आले आहे. मात्र अधिकृत माहिती समोर आली नाही. याचवेळी महाकुंभ येथे पवित्र स्नान करण्यासाठी हेमा मालीनीदेखील पोहोचल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाददेखील साधला. त्या म्हणाल्या की, “महास्नानच्या या पवित्र वेळी मला इथे गुरु स्वामी श्री अवधेशानंद यांचे आशीर्वाद मिळाले. त्यानंतर मी पवित्र स्नानदेखील केले. हे माझं सौभाग्य आहे. मला खूप छान वाटले.
#WATCH | Prayagraj | On taking a holy dip at Triveni Sangam on Mauni Amawasya, BJP MP Hema Malini says, "It is my good fortune that I got the opportunity to do 'snan' on this auspicious day." pic.twitter.com/ZozgvVsIYO
— ANI (@ANI) January 29, 2025
नंतर त्या म्हणाल्या की, “कोट्यावधी संख्येने इथे भाविक हजर राहिले आहेत. मला इथे पवित्र स्नान करण्याची संधी मिळाली त्यासाठी मी ऋणी आहे”. हेमा यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेमा यांच्याबरोबर बाबा रामदेवदेखील कुंभमेळ्यामध्ये पोहोचले आहेत. त्यांनी सर्व विधीप्रमाणे अमृत स्नान केले. तसेच पाठपूजादेखील केली.
अमृत स्नानाच्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी गोंधळ उडाला. आतापर्यंत २० ते २५ लोक जखमी झाल्याचे वृत्त हाती येत आहे. पण आता तेथील स्थिती नियंत्रणात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांनी संगमाकडे न येण्याची विनंती केली आहे. प्रयागराज येथे २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत महाकुंभ मेळा सुरु राहणार आहे.