बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान हा नेहमी चर्चेत असलेला बघायला मिळतो. ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांचे दिग्दर्शन कबीरने केले आहे. त्याच्या सर्व चित्रपटांना चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळाली आहे. त्याचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकुळ घालताना दिसतात. मात्र आता तो कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या संपूर्ण भारतभर महाकुंभ मेळ्याची चर्चा सुरु आहे. या मेळ्यामध्ये जगभरातून भाविक येत आहेत. कलाकारांचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यामध्ये आता कबीरदेखील महाकुंभ येथे स्नान करण्यासाठी पोहोचणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. (kabir khan at mahakumbh)
कबीर हा मुस्लिम धर्मातील आहे. मात्र तरीही तो महाकुंभमध्ये जाऊन पवित्र स्नान करणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे. याबद्दल त्याने ‘एएनआय’बरोबर संवाद साधला. तो म्हणाला की, “मी खूप उत्सुक आहे. १२ वर्षांनी एकदा हा सोहळा समोर येतो. मी इथे येऊन स्वतःला खूप भाग्यवान समजत आहे. इथे मी पवित्र स्नानदेखील करणार आहे. हे हिंदू-मुस्लिम असं नाही. हे आपली मुळं, आमचा देश व आपल्या संस्कृती सभ्यतेबद्दल आहे. यामध्ये कोणीही हिंदु किंवा मुस्लिम नाही. जर तुम्ही भारतीय आहात असे मानत असाल तर तुम्ही सगळे अनुभव घेऊ शकता”.
#WATCH | Prayagraj, UP: On his Maha Kumbh visit, Film Director Kabir Khan says "I am very excited. This happens once in 12 years. I feel fortunate to have come here. I will take a holy dip here too. These things are not about Hindus and Muslims, these are the things of our… pic.twitter.com/oXabr6I0NQ
— ANI (@ANI) January 28, 2025
दरम्यान आतापर्यंत अनेक कलाकार व दिग्गज व्यक्तींनी महाकुंभमध्ये पवित्र स्नान केले आहे. यामध्ये अनुपम खेर, मिलिंद सोमन, रेमो डिसूजा, सुनील ग्रोव्हर या कलाकारांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी कोल्डप्लेचा गायक ख्रिस मार्टिनदेखील गर्लफ्रेंड डिकोटा जॉन्सनबरोबर महाकुंभ येथे पोहोचला होता. त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
कबीरच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, त्याने आजवर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. गेल्या वर्षी कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. याआधी त्याने रणवीर सिंहचा ’८३’, सलमान खानचा ‘ट्यूबलाइट’, ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.