बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सैफवर राहत्या घरात एका अज्ञात व्यक्तीने चोरीच्या बाहण्याने घरी घुसण्याच्या प्रयत्नात असताना हल्ला केला. चाकूने केलेल्या हल्ल्यामध्ये सैफ गंभीर स्वरुपात जखमी झालेलादेखील दिसून आला. त्याला उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर काही दिवसांतच तो घरी परतला. घरी परतल्यानंतरचे त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु होता. तपासादरम्यान शरीफुल इस्लाम शहजादला मुख्य आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. आजवर तो पोलिस कोठडीत होता. त्याच्याबद्दलची अपडेट आता समोर आली आहे. (saif ali khan attacker judical custody)
गेले अनेक दिवस पोलिस कोठडित असणाऱ्या शरीफुलची न्यायालयीन चौकशी पूर्ण झाली आहे. यावेळी त्याला पोलिस कोठडीतून १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आले आहे. दरम्यान तपासात पुन्हा काही आढळले तर BNSS कायद्याअंतर्गत पोलिस कोठडीची मागणी करण्यात येऊ शकते. न्यायालयाने वांद्रे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना विचारण्यात आले. त्यावेळी जर गरज असेल तर पोलिस कोठडी मागण्याय येईल असे सांगितले.
या संपूर्ण प्रकरणावर मुंबई पोलिसांनी भाष्य केलं आहे. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली असून त्यात त्यांनी आरोपींबाबत अनेक खुलासे केले आहेत. सैफवर हल्ला झालेल्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखा करत आहेत. ते म्हणाले की, “पोलिसांना अद्याप फिंगरप्रिंटचा अधिकृत अहवाल मिळालेला नाही. पण आमच्याकडे आरोपींविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत”, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं.
दरम्यान, १६ जानेवारीला सकाळी सैफवर अनेक वेळा हल्ला करण्यात आला. लीलावती रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात सैफला पाच ठिकाणी दुखापत झाल्याचेही नमूद करण्यात आले. त्याची पाठ, मनगट, मान, खांदे आणि कोपर या अवयांवर वार करण्यात आले. यानंतर शस्त्रक्रिया करुन त्याला २१ जानेवारी रोजी डिस्चार्ज मिळाला. सैफची प्रकृती आता स्थिर असली तरी अभिनेत्याला महिना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.