‘बिग बॉस १७’च्या ‘वीकेंड का वार’ मध्ये सलमान खानने स्पर्धकांच्या कुटुंबीयांना स्टेजवर बोलावले होते. यावेळी कोणाची आई तर कोणाचे वडील आले होते. दरम्यान, विकी जैनच्या कुटुंबीयांच्या वतीने त्याची वाहिनी रेशु जैन आलेली पाहायला मिळाली. रेशुला पाहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत तिचं स्वागत केलं. सलमान खानच्या प्रश्नांना रेशुने चोख उत्तर दिलेलं पाहायला मिळालं. रेशुने यावेळी सासूपासून ते अंकितापर्यंत सर्वांचा बचाव करत त्यांची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं. (Ankita Jain Bhabhi Reshu Jain)
जेव्हा रेशु जैन या शोमध्ये सहभागी झाली आणि ती स्टेजवर येऊन बोलू लागली तेव्हा प्रेक्षक तिचे फॅन झाले. नेटकरी म्हणू लागले की, ती खूप सुंदर आहे. अंकिता लोखंडेपेक्षा लाख पटीने चांगली आहे. विकी जैनच्या वहिनीनेही शोमध्ये येऊन सासूचा बचाव करत अंकिताच्या बाजूने बरेच काही सांगितले होते. तर अंकिता शोमध्ये असे कधीच काही बोलली नाही. पतीला मारहाण करण्याबाबत ती नेहमी बोलायची. त्यामुळे तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. पण रेशु जैन हिने अंकिता लोखंडेची प्रतिमा सुधारण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या त्यावरुन सर्वांनी रेशूचे कौतुक केले. दरम्यान रेशु जैन जास्त फेमस झाली तर अंकिता लोखंडे असुरक्षित होईल असंही प्रेक्षक म्हणताना दिसले.
अंकिता लोखंडेला शोमध्ये येऊन ३ महिने झाले पण रेशु जैनने केवळ ३० मिनिटांत लोकांकडून प्रेम मिळवले. सोशल मीडियावर लोक रेशुला क्लास व अंकिता लोखंडेला क्लासलेस म्हणत आहेत. रेशु जैन यांची छाप कितीही असली तरी लोक ३० मिनिटांत कोणाला जज करु शकत नाहीत. ती किती चांगली व अंकिता किती वाईट हे सांगता येत कठीण आहे. कारण ज्या पद्धतीने तुम्ही या अभिनेत्रीचा तीन महिन्यांचा संपूर्ण प्रवास पाहिला असेल. त्यामुळे तिला तशा प्रसंगातून जावे लागले असेल, त्यामुळेच तिची राहण्या, बोलण्याची पद्धत पाहता आली. असे काही रेशु जैनबाबत घडले नाही. जर ती देखील ‘बिग बॉस’च्या घरात आली तर तीही अशीच वा याहून वेगळी वागू शकते.
अंकिता लोखंडेने जावेच्या म्हणण्याला न जुमानता स्वत:मध्ये कोणताही बदल घडवून आणला नाही. ती विक्की जैनशीही तशीच वागायची आणि त्याची चेष्टा करायची. त्याचवेळी विकी जैनही पत्नीबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले. मात्र, आता त्याला शोमधून बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त आहे. रेशु जैन ही विक्की जैनचा मोठा भाऊ विशाल जैन याची पत्नी आहे. जेव्हा ती शोमध्ये आली तेव्हा विकी असं म्हणाला होता की, “वहिनी खूप बोलतात. त्यांनी काही गोष्टींवर जास्त बोलू नये”. मात्र तसे काहीच घडले नाही. विकीच्या वाहिनीने कुटुंबाचा मान राखत भाष्य केलं. रेशु जैन व विशाल जैन यांना एक मुलगी व एक मुलगा आहे. त्यांचं कुटुंब बिलासपूर, छत्तीसगड येथे राहतं. रेशु जैन पेशाने फिजिओथेरपिस्ट आहे. तसेच, ती बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूल, बिलासपूरच्या MD म्हणजेच व्यवस्थापकीय संचालक या पदावर आहे.