शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अमृता खानविलकर सेटवर स्वतःची घेऊन जाते शेगडी, आई जेवण बनवून देते अन्…; शेअर केला Inside Video

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 23, 2024 | 3:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amruta Khanvilkar New Video

अमृता खानविलकर सेटवर स्वतःची घेऊन जाते शेगडी, आई जेवण बनवून देते अन्…; शेअर केला Inside Video

अभिनेत्री अमृता खानविलकरने आजवर तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली. अमृताने आजवर अभिनयासह तिच्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्याने अमृताला जगभरात प्रसिद्धी मिळाली. याशिवाय अमृता सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. अमृताचा सोशल मीडियावरील वावर बर्यापैकी सक्रिय आहे. सोशल मीडियावरील रील व्हिडीओद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात असते. (Amruta Khanvilkar New Video)

अमृता तिच्या कुटुंबियांसाठीही वेळात वेळ काढून काही खास क्षण घालवताना दिसते. खासकरून अमृता तिच्या आई बरोबरचे अनेक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करताना दिसते. अशातच अभिनेत्री सध्या शुटिंगनिमित्त महाबळेश्वर येथे गेली असल्याचं समोर आलं आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवरुन स्टोरी पोस्ट करत अभिनेत्रीने याबाबतची माहिती दिली आहे. दोन दिवसापासून अमृता शुटिंगनिमित्त तिच्या आईसह महाबळेश्वर येथे आहे.

आणखी वाचा – “मिठी मारावीशी वाटली अन्…”, अयोध्येमध्ये बागेश्वर महाराजांना भेटली कंगना रणौत, भारावून गेली, म्हणाली, “चरण स्पर्श…”

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

शूटिंगसाठी बाहेर गेल्यानंतर कलाकारांचे बरेच हाल होतात. कित्येकदा या कलाकार मंडळींना बाहेरच जेवण जेवावं लागत. बरेचदा हे बाहेरच जेवण चांगलं नसतं तर सतत डाएटमुळे बाहेरच खाणं शरीरास घातक ठरतं. अशावेळी अमृता व तिच्या आईने शोधून काढलेला पर्याय अमृताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. अमृताने तिच्या आईचा व्हॅनिटी व्हॅनमध्ये खिचडी बनवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्वतःची छोटीशी इलेक्ट्रिक शेगडी घेऊन येत त्यांनी हा खिचडीचा बेत आखलेला पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठासोहळ्याच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केला अभिमानास्पद क्षण

अमृताच्या आईने अमृतासाठी स्वतःच्या हाताने बनवलेली ही खिचडी आणि त्यासाठी घातलेला हा थाटमाट पाहणं रंजक ठरलं. या व्हिडीओला तिने कॅप्शन देत असं म्हटलं की, “मी माझी स्वतःची शेगडी जाईन तिथे घेऊन जाते. तवा, ब्लेंडर अशा बऱ्याच गोष्टी मी माझ्याबरोबर कॅरी करते” असं तिने म्हटलं आहे.

Tags: amruta khanvilkaramruta khanvilkar motheramruta khanvilkar shootingamruta khanvilkar videoentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bigg boss Ankita lokhande reveals why she keep talking about sushant singh Rajput see the details

फायद्यासाठी सुशांत सिंह राजपूतचं नाव सातत्याने घेत होती अंकिता लोखंडे?, भडकून दिलं उत्तर, म्हणाली, "त्याच्याबद्दल काही बोलले तर..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.