शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “तुम्ही दोघांनी…”, ‘बिग बॉस’च्या घरात नवरा-बायकोमध्ये होणारी भांडणं पाहून अंकिता लोखंडेच्या सासूने सुनावलं, म्हणाली, “विचित्र पद्धतीने…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 25, 2023 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : "तुम्ही दोघांनी…", 'बिग बॉस'च्या घरात नवरा-बायकोमध्ये होणारी भांडणं पाहून अंकिता लोखंडेच्या सासूने सुनावलं, म्हणाली, "विचित्र पद्धतीने…"

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरातील सगळेच स्पर्धक एकापेक्षा एक असलेले पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात यावेळी स्पर्धक म्हणून प्रवेश केलेल्या अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैनची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. हे सेलिब्रिटी कपल जोरदार चर्चेत आहे कारण या कपलमध्ये होणारे वाद आता विकोपाला पेटले आहेत. भरपूर प्रेम असणाऱ्या या जोडप्यात अचानक सुरु झालेल्या भांडणामुळे हे कपल आता वादग्रस्त कपल झालं असल्याचं बोललं जात आहे.

अशातच ‘बिग बॉस’च्या घरात चाहत्यांना आता एक सरप्राइज मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अंकिता लोखंडे व विकी जैनची आई त्यांना भेटायला आले असल्याचे दाखवण्यात आले आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या प्रोमोमध्ये, अंकिता व विक्की जैन यांची त्यांच्या आईंबरोबर भेट होते. आई समोर पाहून अंकिता लोखंडे व विक्की जैन भावुक होतात. व्हिडिओमध्ये असे पाहायला मिळत आहे की,अर्काइव्ह रूममध्ये अंकिता व विकी बसलेले असतात, तर त्यांच्या समोर दोघांच्या आई बसलेल्या असतात.

आणखी वाचा – Video : “दिग्दर्शकाकडे माझ्या काही मागण्या…”, कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, म्हणाला, “बाकी गोष्टी मी सांभाळून घेईन पण…”

अंकिता जेव्हा तिच्या आईला समोर पाहते तेव्हा ती भावुक होते. ‘आय लव यू मां’, ‘आय मिस यू मम्मा’ असं ती बोलताना दिसते. त्याच्या नंतर विक्कीही त्याच्या आईला पाहून रडू लागतो. यानंतर विक्कीची आई दोघांचे कान पिळताना दिसते. विकीची आई दोघांना म्हणते की, ‘तुम्ही दोघांनी कधीच घरी भांडण केलं नाही आणि इथे किती विचित्र पद्धतीने भांडत आहात. जेव्हा तुम्ही एकमेंकाना भेटता तेव्हा तुमचं प्रेम दिसू द्या, एकमेकांबद्दल कायम प्रेम ठेवा” असं या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. आता यानंतर दोघांच्या आई त्यांना काय कानमंत्र देणार हे पाहणं येणाऱ्या भागात रंजक ठरेल.

Tomorrow's episode promo #WeekendKaVaar #BiggBoss17pic.twitter.com/nWXR7WcxJ2

— BiggBoss 24×7 (@BB24x7_) November 24, 2023

आणखी वाचा – Video : वडिलांना अखेरचा निरोप देताना ढसाढसा रडला अरमान कोहली, उपस्थितांचेही डोळे पाणावले, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर अंकिता व विक्की यांच्यात अनेकदा लढाई झालेली पाहायला मिळाली. विक्की अनेकदा अंकितावर भडकताना दिसला. यावरून त्याला सलमान खानही ओरडला.

Tags: ankita lokhandeankita lokhande motherbigg bossbigg boss 17entertainmentvicky jainvicky jain mother
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
rajesh kumar went bankrupt after leaving acting

…अन् सुप्रसिद्ध अभिनेत्यावर शेती करण्याची आली वेळ, आता झाली आहे अशी अवस्था, म्हणाला, "कर्जबाजारी झालो अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.