Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या घरातील सगळेच स्पर्धक एकापेक्षा एक असलेले पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात यावेळी स्पर्धक म्हणून प्रवेश केलेल्या अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैनची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. हे सेलिब्रिटी कपल जोरदार चर्चेत आहे कारण या कपलमध्ये होणारे वाद आता विकोपाला पेटले आहेत. भरपूर प्रेम असणाऱ्या या जोडप्यात अचानक सुरु झालेल्या भांडणामुळे हे कपल आता वादग्रस्त कपल झालं असल्याचं बोललं जात आहे.
अशातच ‘बिग बॉस’च्या घरात चाहत्यांना आता एक सरप्राइज मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अंकिता लोखंडे व विकी जैनची आई त्यांना भेटायला आले असल्याचे दाखवण्यात आले आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या प्रोमोमध्ये, अंकिता व विक्की जैन यांची त्यांच्या आईंबरोबर भेट होते. आई समोर पाहून अंकिता लोखंडे व विक्की जैन भावुक होतात. व्हिडिओमध्ये असे पाहायला मिळत आहे की,अर्काइव्ह रूममध्ये अंकिता व विकी बसलेले असतात, तर त्यांच्या समोर दोघांच्या आई बसलेल्या असतात.
अंकिता जेव्हा तिच्या आईला समोर पाहते तेव्हा ती भावुक होते. ‘आय लव यू मां’, ‘आय मिस यू मम्मा’ असं ती बोलताना दिसते. त्याच्या नंतर विक्कीही त्याच्या आईला पाहून रडू लागतो. यानंतर विक्कीची आई दोघांचे कान पिळताना दिसते. विकीची आई दोघांना म्हणते की, ‘तुम्ही दोघांनी कधीच घरी भांडण केलं नाही आणि इथे किती विचित्र पद्धतीने भांडत आहात. जेव्हा तुम्ही एकमेंकाना भेटता तेव्हा तुमचं प्रेम दिसू द्या, एकमेकांबद्दल कायम प्रेम ठेवा” असं या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. आता यानंतर दोघांच्या आई त्यांना काय कानमंत्र देणार हे पाहणं येणाऱ्या भागात रंजक ठरेल.
Tomorrow's episode promo #WeekendKaVaar #BiggBoss17pic.twitter.com/nWXR7WcxJ2
— BiggBoss 24×7 (@BB24x7_) November 24, 2023
‘बिग बॉस’च्या घरात आल्यानंतर अंकिता व विक्की यांच्यात अनेकदा लढाई झालेली पाहायला मिळाली. विक्की अनेकदा अंकितावर भडकताना दिसला. यावरून त्याला सलमान खानही ओरडला.