छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस’. नुकतंच या कार्यक्रमाचं १७ वं पर्व सुरु झालं आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच ‘बिग बॉंस’च्या घरात बरंच नाटकीय वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे. सध्या घरात दोन वाईल्ड कार्ट एन्ट्री झाल्या आहेत. ज्यात समर्थ जुरेल व मनस्वी मोगाई यांचा समावेश आहे. या दोघांना घरात येऊन एक आठवडा होणार असून पहिल्या आठवड्यात या दोन्ही वाईल्ड कार्ड कंटेस्टेंटना बीग बॉसच्या घरातून बेघर होण्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. (Bigg boss 17 this weekend ka vaar)
‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार शुक्रवारी शोचा तिसरा विकेंड हल्ला होणार आहे. या विकेंडला सलमान खान घरातील बऱ्याच सदस्यांची जोरदार हजेरी घेणार. याच वेळी शोमधून एक स्पर्धकाला देखील काढून टाकण्यात येणार आहे. अशा सर्व परिस्थितीत कोणता स्पर्धक घराबाहेर पडणार याचा अंदाज सर्वजण लावताना दिसत आहेत. समर्थ व मनस्वी यांच्याबरोबर ईशा मालवीय, अरुण मशेट्टी, विक्की जैन व सना रईस खान हे नॉमिनेटरच्या लिस्टमध्ये आहेत.
अशातच सगळे अंदाज लावत आहेत की सना यावेळी शोमधून बाहेर होईल असा अंदाज प्रत्येकजण लावत आहे. पण बिग बॉसच्या माहितीनुसार या आठवड्यात सना नाही तर आणखी कोणीतरी कंटेस्टेंट आउट होणार आहे.या आठवड्यात नॉमिनेट होणारा स्पर्धक दुसरी कोणी नसून मनस्वी मोगई आहे. बिग बॉस खबरीने ट्विट करत ही माहिती दिली. या ट्विटमध्ये स्पष्टपणे लिहिलं गेलं की, ‘अफवांनुसार, मनस्वीला घरातून बाहेर काढण्यात येणार आहे. पण हे कितपत तथ्य आहे हे विकेंडच्या भागातच स्पष्ट होईल’.
मनस्वी मोगई शोच्या सुरुवातीपासूनच ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करणार होती. मात्र कोणत्यातरी कारणांमुळे ती त्यावेळी आली नाही. पण त्यानंतर तिने या शोमध्ये वाईल्ड कार्ड एंन्ट्री घेतली. शोमध्ये तर ती तिच्या प्रतिक्रिया सांगताना दिसत आहे. असं असूनही ती कमी दिसून येते आहे. अशातच ती पहिल्या आठवड्यात घरातून बेघर झाल्यास तिच्या चाहत्यांना झटका लागणार आहे.