बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक धाकड व्यक्तिमत्त्वाची अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगना नेहमी कोणत्याही विषयावर परखडपणे मतं मांडताना दिसते. मग तो राजकीय विषय असो किंवा सामाजित प्रत्येक मुद्द्यावर ती स्वतःचं मत ठामपणेे मांडते. त्यामुळे तिला बऱ्याचदा राजकीय क्षेत्रात पदार्पण करणार का?, असा प्रश्न विचारला जातो. पण प्रत्येक वेळी ती या प्रश्नावर नकार दिते. पण नुकतीच ती द्वारकेला श्री कृष्णाच्या दर्शनासाठी गेली होती त्यावेळी तिने मीडियाबरोबर बोलताना राजकारणात प्रवेश करण्याबाबत सकारात्मक वक्तव्य केलं आहे. (Kangana ranaut hints to contest loksabha election)
‘तेजस’ चित्रपटाच्या प्रदर्शित झाल्यानंतर कंगना गुजरातच्या प्रसिद्ध यात्राधाम द्वारकाधीश मंदिरात पोहोचली. तिथे तिने द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं. तसंच तिने नागेश्वर मंदिरात जाऊनही आशीर्वाद घेतला. त्यानंतर तिने मीडियाबरोबर संवाद साधला. त्यावेळी कंगनाने लोकसभा निवडणूक लढण्याबद्दल हिंट दिली आहे. यावेळी ती बोलताना म्हणाली, “जर भगवान श्री कृष्णाची कृपा राहिली तर लोकसभा निवडणूक लढणार”, असं वक्तव्य केलं.
कंगनाने द्वारकेतील फोटोदेखील पोस्ट केले आहेत. त्या फोटोंना कॅप्शन देत तिने लिहीलं, ‘काही दिवसांपासून हृदय खूप व्याकुळ होतं. द्वारकाधीशचं दर्शन घ्यावं असं मनात आलं. श्री कृष्णाच्या या दिव्य द्वारका नगरीत आल्यानंतर येथील धुळीचं दर्शन घेताच माझी सगळी चिंता माझ्या पायाकडे येऊन पडल्यासारखं वाटलं. आता माझं मन पूर्णपणे स्थिर झालं आहे. अनंत आनंदाची अनुभूती झाली. हे द्वारकाधीश अशीच तुमची कृपा माझ्यावर ठेवा. हरे कृष्णा’.
यावेळी कंगना मीडियाबरोबर बोलताना म्हणाली, ‘द्वारका नगरी ही दिव्य नगरी आहे. इथली प्रत्येक गोष्ट खूप अद्भूत आहे. येथील प्रत्येक कणात द्वारकाधीश सामावलेले आहे आणि द्वारकाधीशच्या दर्शनाने आपण धन्य होऊन जातो. माझा नेहमीच प्रयत्न असतो की मी इथे दर्शनाला यावं. पण कामामुळे येणं संभव होत नाही. असं वाटतं सरकारने अशी सोय केली पाहिजे ती पाण्याच्या खाली असलेली द्वारका बघू शकू. आपलं जे महान नगर आहे ज्यात भगवान श्री कृष्ण वास करत आहेत ते आमच्यासाठी स्वर्गाहूनही कमी नाही’, असं सांगत तिने यासह राम मंदिराबद्दलही वक्तव्य केलं.