शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “अजूनही त्याचे वडील…”, अंकिता लोखंडेच्या आईचा मोठा खुलासा, अजूनही सुशांत सिंह राजपूतचं कुटुंब संपर्कात, म्हणाली, “मुलीसारखं प्रेम अन्…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 16, 2024 | 5:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : "अजूनही त्याचे वडील…", अंकिता लोखंडेच्या आईचा मोठा खुलासा, अजूनही सुशांत सिंह राजपूतचं कुटुंब संपर्कात, म्हणाली, "मुलीसारखं प्रेम अन्…"

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’च्या घरात सध्या अंकिता लोखंडे व विकी जैन यांचा वाद सुरु असलेला पाहायला मिळत आहे. दोघांमधील भांडणाची चर्चा आता शोच्या बाहेरही रंगली आहे. अंकिताने तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतचा शोमध्ये अनेकदा उल्लेख केला आहे. अंकिताने सुशांतचा केलेला उल्लेख तिच्या सासूबाईंना म्हणजेच विकीच्या आईला आवडला नाही. इतकंच नव्हे तर नेटकऱ्यांनी सुशांतचे नाव घेतल्याने अंकिताला ट्रोलही केले आहे. दरम्यान, अभिनेत्रीची आई वंदना लोखंडे यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

अंकिताची आई वंदना लोखंडे यांनी नुकतीच मीडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अंकिता व सुशांतच्या नात्याबद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, “त्यांच्यातील नाते खूप घट्ट आहे. ज्याचे ते स्वतः साक्षीदार आहेत. ती सुशांत व अंकिताबरोबर राहिली आहे. वंदना लोखंडे म्हणाल्या, “मी दोघांबरोबर एकाच घरात राहिले आहे आणि सुशांतला मी सात वर्षांपासून ओळखत होते. अंकिताचे त्याच्यावर खूप प्रेम होते. अशा परिस्थितीत स्वतःला सांभाळणे तितके सोपे नसते. अंकिता खूप भावूक व्यक्ती आहे” असंही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा – “आमचा जलवा…”, पहिल्या मकरसंक्रांतीसाठी अमृता-प्रसादचा एकमेकांसाठी लाजत खास उखाणा, अभिनेत्री म्हणाली, “साम्राज्याच्या…”

याशिवाय अंकिताच्या आईने विक्की जैनचे कौतुक केलेलं पाहायला मिळालं. त्या म्हणाल्या, “तो नेहमी अंकिताच्या पाठीशी उभा राहिला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता खूपच कोलमडली होती तेव्हा तो तिच्याबरोबर होता. तो नेहमीच अंकिताच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. मी विकीला चांगलं ओळखते, मी त्याला माझा मुलगाच मानते” असंही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा – “तुझं मन…”, अंकिता लोखंडेला सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीचा पाठिंबा, अभिनेत्रीची सासू पुन्हा भडकणार का?, म्हणाली, “अतिशय शुद्ध…”

पुढे, सुशांतबद्दल बोलताना अंकिताची आई म्हणाली, “सुशांत खूप चांगला माणूस आणि खूप हुशार होता. आजही सुशांतची बहीण श्वेता व राणी अंकिताशी फोनवर बोलतात. त्याचे वडील केके सिंह देखील अंकिताला काही दिवसांतून एकदा फोन करतात. सुशांतचे कुटुंबीय अजूनही अंकितावर त्यांच्या मुलीसारखे प्रेम करतात” असंही त्या म्हणाल्या. अंकिताच्या आईने सांगितले की, “तिची मुलगी आपले नाते वाचवण्यासाठी काहीही करु शकते”.

Tags: ankita lokhandeankita lokhande motherbigg boss 17sushant singh rajputsushant singh rajput familyvicky jain
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Bollywood actress hema malini will be perform dance drama based on ramayan in ayodhya see the details

अयोध्यामध्ये हेमा मालिनी नृत्य सादर करणार, राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जय्यत तयारी, म्हणाल्या, "मी पहिल्यांदाच..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.