प्रसिद्ध हिंदी टीव्ही शो ‘बिग बॉस’च्या १७वं पर्व सध्या जोरदार चर्चेत आहे. या शोमध्ये कलाकारांची एन्ट्री होताच अनेक वाद पाहायला मिळालेले आहे. यंदाच्या घरात अनेक कलाकारांच्या जोडी आलेल्या आहे. त्यातील सर्वात गाजलेली जोडी म्हणजे मराठमोळी अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. शोच्या पहिल्याच दिवसांपासून ही जोडी बरीच चर्चेत राहिली आहे. दोघांमधील मतभेद असो, किंवा इतर स्पर्धकांशी सुरु असलेली मैत्री, त्यानंतर जोरदार वाद प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अशात ही लोकप्रिय जोडी त्याच घरातील एका जोडप्यासह झालेल्या जोरदार वादामुळे चर्चेत आले. (Bigg Boss 17 new promo)
‘बिग बॉस १७’च्या घरात अंकिता-विकीसह नील भट्ट व ऐश्वर्या शर्मा या जोडीने देखील प्रवेश केला होता. शोच्या पहिल्याच दिवसांपासून दोन्ही जोड्यांमध्ये मैत्री पाहायला मिळाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखत असून या दोन्ही जोड्यांमधील उत्तम बॉण्डिंग या पर्वत पाहायला मिळाली आहे. मात्र, आता या जोडीमध्ये जोरदार वाद रंगले असून दोघांच्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा – Video : ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओबाबत अखेर रश्मिका मंदानाने सोडलं मौन, म्हणाली, “धक्कादायक गोष्ट…”
नुकताच या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये अंकिता-विकी व नील-ऐश्वर्या यांच्यात जोरदार वाद रंगताना दिसत आहे. “मला का नॉमिनेट केलं?”, असा प्रश्न विकी ऐश्वर्याला विचारतो. त्यावर ती विकीला “तू तुझं बघ.”, असं म्हणाली. ज्यावर अंकिता संतापली आणि म्हणाली की, “मी तर ऐश्वर्याशी चांगली वागली होती. तरी तिने माझ्याबरोबर असा खोटा दिखावा का केला?”. त्यानंतर नील व अंकितामध्ये हा वाद वाढत जातो. या वादानंतर नीलचा राग अनावर झाला आणि तो जोरजोरात ओरडताना दिसला. पुढे ऐश्वर्या अंकिताला ‘चुड़ैल’ म्हणाली. त्यावर अंकिता व विकीदेखील तिला चुड़ैल म्हणतात. हा शब्द ऐकून ऐश्वर्याचा राग अनावर होतो, तेव्हा नील तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो.
हे देखील वाचा – पत्त्यांचा खेळ, टेबलवर पैशांचा ढिग अन्…; महेश बाबू व वेंकटेश यांचा ‘तो’ फोटो व्हायरल, नेटकरीही भडकले
त्यांच्या या जोरदार भांडणाचा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया करताना दिसले. ही पहिलीच वेळ नसून, याआधीही ऐश्वर्या आणि विकीमध्ये जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला होता. यंदाच्या पर्वात अंकिता-विकी व नील-ऐश्वर्या व्यतिरिक्त ईशा मालवीय, समर्थ जुरेल आणि अभिषेक कुमार देखील चांगलेच चर्चेत आलेले आहे.