हिंदी टेलिव्हीजनवरील सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाला वादविवादांपासूनच सुरुवात झाली. यंदाच्या पर्वात सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन ही रिअल लाईफ जोडीदेखील सहभागी झाली. दरम्यान, या शोच्या पहिल्याच दिवसांपासून दोघांमध्ये अनेकदा खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अनेकदा दोघंही एकमेकांवर चिडतानाही दिसले. अशातच आता या जोडीचा आणखी एका भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता-विकी यांच्यातील भांडण पाहून प्रेक्षकही अवाक झाले आहेत. (Bigg Boss 17 Ankita Lokhande And Vicky Jain Fights Video Viral)
नुकताच ‘बिग बॉस १७’चा एक नवीन प्रोमो प्रदर्शित झाला. यामध्ये अंकिता-विकीचा वाद विकोपाला गेल्याचे चित्र दिसत आहे. प्रदर्शित झालेल्या या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ घरातील सदस्यांना तुमच्यासमोर आता नवीन ट्विस्ट येणार असल्याचे सांगत आहेत. ‘बिग बॉस’ विकीला ‘दिल वाले मकान’मधून ‘दिमाग वाले मकान’मध्ये पाठवतात. दरम्यान ‘बिग बॉस’ खेळामध्ये एक ट्वीस्ट आणतात. घरातील सदस्यांसमोर एक मॅसेज ते वाचून दाखवतात. “विकी भैय्याला ‘दिमाग वाले मकान’मध्ये पाठवणं होतंच. त्याव्यतिरिक्त मी काय करु शकलो असतो?”.
Promo #BiggBoss17, Ghar me hua tabadla, #AnkitaLokhande aur #VickyJain ka change house pic.twitter.com/EoiPnHV0tX
— The Khabri (@TheKhabriTweets) November 12, 2023
यानंतर ‘बिग बॉस’ अंकिताला “तुझा चेहरा इतका निराश का आहे?” असं विचारतात आणि तिला निराश झालेले पाहून “ज्याच्यासाठी तुला इतकं वाईट वाटत आहे, तो तिथे नाचत आहे. आनंदी आहे” असं सांगतात. यानंतर विकी अंकिताला समजवायला जातो. तेव्हा ती चिडून “तू इथून निघून जा” असं म्हणत त्याला लाथ मारते. पुढे ती त्याला “तू खरोखर स्वार्थी आहेस. मूर्ख आहेस” असं म्हणत “तुझ्यासोबत राहून माझं नशीब खरंच खराब झालं” असंही म्हणते. यानंतर त्याच्यापासून दूर जात ती त्याला “आपण आता विवाहित आहोत हे विसरून जा. आजपासून तू वेगळा, मी वेगळा. तू माझा वापर केलास” असं रागाने म्हणते. यावर विकी तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, मात्र ती त्याचे काहीही ऐकून न घेता निघून जाते.
दुसरीकडे, बाबू भैय्या व अनुराग अरुण यांच्यातदेखील जोरदार भांडण होताना दिसत आहेत. त्यांच्यातील भांडणाची परिस्थिती हाणामारीपर्यंत जाते आणि याचा परिणाम ‘बिग बॉस’च्या घरातील सर्व सदस्यांवर होतो. ‘बिग बॉस’ घरातील सर्व सदस्यांसाठी स्वयंपाकघर बंद ठेवतात. त्यामुळे आता येत्या आठवड्यात सलमान अंकिता व विकीला काय बोलतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या भागात कोणती नाती दूर जाणार?, कोणती नाती जवळ येणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत.