बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीच्या यादीत अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची नाव अग्रस्थानी आहेत. महाराष्ट्राचे दादा वाहिनी म्हणून त्यांना ओळखलं जातं. रितेश आणि जिनिलीयाची केमिस्ट्री ही प्रेक्षकांना विशेष भावते. रितेश-जिनिलीयाचे एकत्र केलेले फोटोशूटचीही विशेष चर्चा रंगलेली असते. जवळपास ९ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०१२ मध्ये या जोडीने लग्नगाठ बांधली. त्यांच्या प्रेमाचं बरेचदा उदाहरणही दिलं जातं. (Genelia Deshmukh Diwali Video)
सिनेसृष्टीत रितेश आणि जिनिलीयाच्या मुलांचीही विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यांच्यावरील संस्कारांचे प्रत्येकवेळी सर्वत्र कौतुक होते. रियान व राहील अशी त्यांना दोन मुलं आहेत. मुलं झाल्यावर जिनिलीयाने काही वर्ष अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेत संसाराकडे विशेष लक्ष दिलं. जिनिलीयाला मराठी संस्कृतीची आवड असलेली एखाद्या सणानिमित्त तिने शेअर केलेल्या फोटो, व्हिडीओवरून कळतं. त्यामुळेच महाराष्ट्राची सून म्हणून ही तिला ओळखलं जातं.
जिनिलीयाने दिवाळी सणानिमित्त शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये देशमुखांच्या घरच्या दिवाळीची झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत दिवाळीनिमित्त जिनिलीयाने दोन्ही मुलांना अभ्यंगस्नान घालताना दिसत आहे. जिनिलीया या व्हिडीओमध्ये रियान व राहीलला उटणं लावून अभ्यंगस्नान घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने या व्हिडीओला ‘वेड’ चित्रपटातील “सुख कळले…” हे गाणं लावलं आहे. शिवाय या व्हिडिओला कॅप्शन देत, “दिवाळी सकाळ, मराठी मुलगी, देशमुख परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा” असं म्हणत हा व्हिडीओ शेअर केला आहे.
जिनिलीयाने दोन्ही लेकांना अभ्यंगस्नान घालतानाच व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जिनिलीया व रितेश यांच्या दोन्ही मुलं ही आई वडिलांपाठोपाठ चर्चेत असतात. मीडियासमोर ते नेहमीच हात जोडून नमस्कार करत त्यांना पोज देतात, यामुळे आई वडिलांनी केलेल्या संस्कारांचंही वेळोवेळी नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात. मुलांच्या संगोपनासाठी जिनिलीयाने तब्बल जवळपास १० वर्ष चित्रपटसृष्टीमधून ब्रेक घेतला होता.