मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आई कुठे…”, फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, फोटो शेअर करत म्हणाली, “यंदाची दिवाळी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 13, 2023 | 2:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Apurva Gore Bought New Car

"आई कुठे…", फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, फोटो शेअर करत म्हणाली, "यंदाची दिवाळी…"

सध्या सर्वत्र दिवाळीनिमित्त उत्साहाचं वातावरण असलेलं पाहायला मिळतंय. कलाकार मंडळीही दिवाळीनिमत्त अनेक फोटोस,व्हिडीओस चाहत्यांसह शेअर करताना दिसत आहेत. दिवाळीनिमत्त अनेकांनी खरेदी करतानाचे व्हिडीओ ही सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. तर काहींनी गाडी खरेदी केल्यानंतरचा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे. अशातच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने गाडी खरेदी करत तिचा आनंद चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. (Apurva Gore Bought New Car)

दिवाळीच्या शुभ मुहूर्ताचं औचित्य साधत ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीने आलिशान गाडी खरेदी केली आहे. ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आहे. आलिशान गाडी खरेदी करणारी अभिनेत्री म्हणजे ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ईशा म्हणजेच अपूर्वा गोरे. गाडीबरोबरचा फोटो शेअर करत तिने ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. “यंदाची दिवाळी जरा जास्तच खास आहे. कृतज्ञता व प्रेमाने या नवीन सदस्याचे स्वागत करत आहे.” असं कॅप्शन देत तिने तिच्या नव्या गाडीचं स्वागत केलं आहे.

आणखी वाचा – Video : सायली संजीवच्या टॅटूने वेधलं साऱ्यांचंच लक्ष, खास व्यक्तीच्या आठवणीमध्ये कोरला अन्…; त्याचा अर्थ नेमका काय?

अपूर्वाच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री गौरी कुलकर्णी, रेवती लेले, खुशबू तावडे, भक्ती रत्नपारखी, अश्विनी कासार, साक्षी गांधी, अश्विनी महांगडे या कलाकार मंडळींनी अपूर्वाला तिच्या नव्या गाडीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अपूर्वाने तिचा गाडीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. यांत अपूर्वाच्या नव्या गाडीसह तिच्या पारंपरिक लूकने ही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Apurva (@apurvagore)

आणखी वाचा – घराच्या बाल्कनीमधून शिवाजी पार्ककडे लक्ष ठेवतानाचा राज ठाकरेंचा फोटो तेजस्विनी पंडितने केला शेअर, म्हणाली, “हे सगळं…”

‘आई कुठे काय करते’ मालिकेतील ईशा या पात्रामुळे अपूर्वा गोरेला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक ही करण्यात आलं. या मालिकेमुळेचं अपूर्वाचा स्वतःचा असा खास चाहतावर्गही निर्माण झाला आहे. मराठी मालिकेसह अपूर्वा हिंदी मालिका विश्वातही झळकली.

Tags: aai kuthe kay karteapurva goremarathi actressnew carstar pravah
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Akshaya Naik celebrates Diwali in Chawl

"कितीही मोठे झालो तरीही…", वरळीतील चाळीतल्या घरी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री साजरी करत आहे दिवाळी, म्हणाली, "कदाचित पुढच्या वर्षी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.