Bigg Boss Updates : छोट्या पडदयावरील ‘बिग बॉस’ हा बहुचर्चित शो आता अंतिम भागाच्या दिशेने जात आहे. अशातच या शोमधील प्रत्येक स्पर्धक जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातील विकी जैन हा स्पर्धक घरात आल्यापासून कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अंकिता लोखंडेबरोबरचे भांडणं, वाद त्याचबरोबर त्याचे घरातील इतर स्पर्धकांशी मैत्री यासारख्या अनेक करणांमुळे विकी चर्चेत राहिला आहे.
अशातच विकीचा एक व्हिडीओ सध्या सोहल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे, ज्यात तो आयेशा खानला मिठी मारताना पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या एका भागामधील व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विकी आयशाला सांत्वन देत घट्ट मिठी मारताना दिसत आहे आणि यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत विकीवर चांगलाच निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी, विकीने आयेशाला आपला पाठिंबा दर्शविला होता आणि त्यानंतर आता हे दोघे एकमेकांना मिठी मारताना पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा – बायकोच्या आठवणीत भावुक झालेल्या रोहित राऊतच्या पोस्टवर जुईलीची कमेंट, म्हणाली, “तुला त्रास देण्यासाठी…”
या व्हिडीओमुळे काही नेटकऱ्यांनी विकीला ट्रोल केले आहे तर काही नेटकऱ्यांनी मन्नाराला टार्गेट केल्याबद्दल अंकिताला फटकारले आहे. यात एकाने कमेंट करत असे म्हटले आहे की, “आता कुठे गेली ती अंकिता लोखंडे जिला मन्नारा व विकीची मैत्री पटत नव्हती. मन्नारा विकीला भैय्या म्हणून बोलायची तेव्हा अंकिताला राग यायचा पण आता विकी व आयेशाबद्दल तिला त्रास नाही का.” तर दुसऱ्याने कमेंट करत असे म्हटले आहे की, “अंकिता तिच्या नवऱ्याला देव मानते आणि मन्नाराची ईर्ष्या करते पण हेच ती आयेशाबाबत का नाही करत?” तर आणखी एकाने असे म्हटले आहे की, “अंकिता खरंच मूर्ख आहे. तिला विकीच्या जवळ कोण जातं हेच कळत नाही”
आणखी वाचा – “आपल्या शूजची साईज…”, आदेश बांदेकरांना वाढदिवसानिमित्त लेकाने दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला “माझ्या मनाची…”
दरम्यान, घरातील स्पर्धकांशी जवळीक साधण्याची विकीची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने माजी स्पर्धक सना खान हिचा हात धरला होता. तर नुकतंच कै दिवसांपूर्वी त्याने आयेशाकडे ‘भिगे होठ तेरे’ हे गाणे गेले होते आणि यावरुन अंकिताने तिला विकीबाबत असुरक्षितता वाटत असल्याचेदेखील सांगितले आहे. आशातच विकीचा हा नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.