अभिनयाने व आपल्या उत्तम नृत्यशैलीने क्रांती रेडकर हिने मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. क्रांती रेडकर कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते. विशेषतः ती त्यांच्या लेकींमुळे चर्चेत असते. क्रांतीला जुळ्या मुली आहेत. झिया व झिदा अशी तिच्या मुलींची नाव आहेत. क्रांती नेहमीच तिच्या मुलींमुळे विशेष चर्चेत असते. क्रांतीच्या लेकीही तिच्यासारख्याच एन्जॉय करताना दिसतात. (Kranti Redkar Daughters)
सोशल मीडियावर क्रांती नेहमीच सक्रिय असते. ट्रेंडिंग रील्स शेअर करत ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर क्रांती तिच्या मुलींबरोबर धमाल मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओज शेअर करते. नुकताच क्रांतीच्या लेकींचा पाचवा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त क्रांतीने लेकींसाठी खास पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर क्रांतीने शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
क्रांतीने तिच्या गोंडस लेकीबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये क्रांतीच्या लेकी गाणं गाताना दिसत आहेत. क्रांतीने हा व्हिडीओ शेअर करत, “रात्रीच्या १ वाजता आमच्याकडे काय सुरु आहे पाहा असं म्हणत लेकी गाणं गाताना दाखवल्या आहेत. बर्थडे पार्टी संपल्यानंतर त्या ‘पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावर सूर धरताना दिसत आहेत. क्रांतीने तिच्या लेकींचा हा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद दिलेला पाहायला मिळत आहे.
क्रांतीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. एका युजरने कमेंट करत, “आपल्या पुढच्या होणाऱ्या भावी गायिका आहेत. रंगीत तालीम सुरू केली” अशी गमतीशीर कमेंट केली आहे. तर एकाने कमेंट करत “किती गोड आहेत त्या” अशी कमेंट केली आहे.