Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय रिऍलिटी शो सध्या रंजक वळणावर आला आहे. या शोचा फिनालेही जवळ आला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांमध्येही चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या नॉमिनेशन स्पेशल टास्कमध्ये ‘ए टीम’ म्हणजेच मुन्नवर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी यांनी ‘बी टीम’ म्हणजेच अंकिता लोखंडे, विक्की जैन, इशा मालविय व आयेशा खानला अपात्र ठरवलं.
‘टीम ए’ म्हणजेच मुन्नवर, मन्नारा, अभिषेक व अरुण अंतिम आठवड्यात पोहोचले. पण या टास्कनंतर घरातील सदस्यांमध्ये दोन गट झाले आणि त्यांच्यात जोरदार भांडणं झाली. यातील इशा व मन्नाराच्या भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी इशाला चांगलेच ट्रोल केलेले पाहायला मिळत आहे. नेटकरीचं नव्हे तर मन्नाराच्या बहिणीनेही इशाला खडेबोल सुनावले आहेत.
#IshaMalviya by saying "30 saal ki bachi" she is clearly age shaming all the 30 yrs woman on National Tv#MannaraChopra#BB17 #BiggBoss17#MunAra @ColorsTV@BeingSalmanKhan
— Diana (@DianaReiy) January 17, 2024
pic.twitter.com/Z8lVdKoXg2
मन्नाराची चुलत बहीण मीरा चोप्रा हिने इशावरील राग व्यक्त करत सोशल मिडियावरुन ट्विट करत एक पोस्ट शेअर केली आहे. इशा व मन्नाराचा व्हायरल झालेला व्हिडीओ ट्विट करत म्हणाली, “गटार सदस्याबरोबर गटार मानसिकता. इशाचं तोंड गटार आहे. पण तू तुझी मर्यादा ओलांडली नाहीस, त्याबद्दल तुझा अभिमान आहे”. असं म्हणत तिने बहिणीला पाठिंबा दर्शविला आहे.
इशा व मन्नारा यांच्या भांडणाच्या व्हिडीओमध्ये असे पाहायला मिळत आहे की, इशा मन्नाराला म्हणते, “सर्वात जास्त अपात्र मुलगी ही आहे. तू कधीच एकटी खेळली नाही. सर्वांचा हात पकडून अंतिम आठवड्यात पोहोचली आहेस”. हे ऐकून मन्नारा म्हणते, “तू ही अंकिता व विकीचा हात पकडला आहेस. तर मग मी अपात्र कशी झाली इशा?”. यावर इशा म्हणते, “आता माझं मत बदललं आहे. जशी तुझी मैत्री प्रत्येक दिवसाला बदलते”. इशा व मन्नाराची ही भांडणं टोकाला पोहोचतात. दोघींचा हाच व्हिडीओ पाहून मन्नाराची बहीण मीरा चोप्रा हिने पोस्ट शेअर करत इशाला टोकलं आहे.