बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अयोध्येतील दुरावस्थेबाबत ‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मणाने व्यक्त केली खंत, अभिनेता म्हणाला, “दर्शन कसे घ्यावे हेच…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 19, 2024 | 4:14 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sunil Lahri On Ayodhya

अयोध्येतील दुरावस्थेबाबत 'रामायण' मालिकेतील लक्ष्मणाने व्यक्त केली खंत, अभिनेता म्हणाला, "दर्शन कसे घ्यावे हेच..."

अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार असून १६ जानेवारीपासूनच त्याच्याशी संबंधित विविध विधींना सुरुवात झाली आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून देशातील जनता या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, या खास कार्यक्रमासाठी पाहुण्यांचे आगमनही सुरु झाले आहे. (Sunil Lahri On Ayodhya)

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये रामाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल व सीतेची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया व लक्ष्मणाची भूमिका साकारणारे सुनील लहरी अयोध्या शहरात पोहोचले होते. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांसह अनेक लोकप्रिय व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे.

आणखी वाचा – “ती फार ओव्हरअ‍ॅक्टिंग…”. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची अंकिता लोखंडेवर आगपाखड, पोस्ट शेअर करत म्हणाली “चारित्र्यावरुन बोलणं…”

लक्ष्मणची भूमिका साकारलेल्या सुनील लहरी यांनी ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत अयोध्येतील अडचणींबद्दल सांगितले. सुनील लहरी म्हणाले, “अयोध्येकडे पाहून विश्वास बसत नाही की हे तेच शहर आहे जिथे आम्ही दोन वर्षांपूर्वी शूटिंगसाठी आलो होतो. इथे बरेच काही बदलले आहे. विशेषत: येथील वाऱ्यातही तुम्हाला ऊर्जा जाणवू शकते. रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने, घरे या सर्वांमध्ये भक्तीमय वातावरण आहे. शहर अतिशय स्वच्छ झाले आहे” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा – काळे मणी अन् डायमंडचं पेंडंट…; अक्षया देवधरच्या नाजूक मंगळसूत्राची चर्चा, आहे फारच खास, युनिक डिझाईनने वेधलं लक्ष

अयोध्येचे कौतुक केल्यानंतर सुनील अडचण सांगत म्हणाले, “येथील एक समस्या म्हणजे हॉटेलमध्ये बुकिंग मिळत नाही आहे. इथली सर्व हॉटेल्स बुक केलेली आहेत. कुठेही रुम्स रिकाम्या नाहीत. त्यामुळे रुम उपलब्ध नसेल तर दर्शन कसे घ्यावे हेच कळत नाही. माझी फ्लाईट कन्फर्म झाली आहे, पण आता मी रुमबद्दल विचार करतोय की श्रीरामांनी मला तिथे बोलावले आहे म्हणजे नक्कीच रुमचीही व्यवस्था होईल” असंही ते म्हणाले.

Tags: entertainmentRam Mandir Inaugurationramayanramayan fame sunil lahriSunil Lahrisunil lahri on ayodhya
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Bhago mohan pyare fame actress sarita mehendale shared son photo on social media see the details

असा पार पडला ‘भागो मोहन प्यारे‘ फेम अभिनेत्रीच्या लेकाचा बारसा, नावाचा खास अर्थ सांगत शेअर केला फोटो

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.